शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही हिंदी चित्रपट जगतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो व्हायरल होत असतात. ज्यावर तिच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळतात. फोटोंसोबतच शिल्पा शेट्टी अनेकदा आपल्या तडफदार डान्सचे व्हिडिओ टाकूनही चाहत्यांना चांगलीच घायाळ करत असते. मात्र नुकताच शिल्पा शेट्टीने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
शिल्पा शेट्टी ही बॉलिवूड जगतातील सर्वात फिट आणि चर्चित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात चांगलीच ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून तिचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. अलिकडच्या काळात शिल्पा शेट्टी चित्रपटात झळकत नसली तरी ती सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. मात्र नुकताच शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला राम राम ठोकल्याचा निर्णय जाहिर केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये शिल्पाने एकसारख्या वस्तूंचा आणि कपड्यांचा आता कंटाळा आला आहे. जोपर्यंत नवीन काही अवतार सापडत नाही तोपर्यंत सोशल मीडियावरुन ब्रेक घेते असा कॅप्शन तिने दिला आहे. शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तसेच अनेक चाहते तिच्या या पोस्टवर कमेंट करत सोशल मीडिया न सोडण्याचाही सल्ला देत आहेत. दरम्यान ९० च्या दशकात आपल्या मनमोहक सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या शिल्पाने धडकन, गर्व, इंडियन, बाजिगर अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.तिच्या या धमाकेदार चित्रपटांची आजही चर्चा पाहायला मिळते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट
- तारक मेहताच्या सेटवर नट्टू काकांना घ्यायचा होता शेवटचा श्वास , कुटुंबीयांनी अशी पूर्ण केली शेवटची इच्छा
- मसाबा गुप्ताने वडील व्हिव्हियन रिचर्ड्सच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त शेअर केला फोटो, सोबत लिहिले ‘हे’ खास कॅप्शन