Saturday, April 20, 2024

याला म्हणतात खरा फिटनेस प्रेमी, चालत्या बसमध्ये शिल्पा शेट्टीने केला व्यायाम, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. नेहमीच विविध कार्यक्रमांमध्ये शिल्पाच्या फिटनेसच्या चर्चा रंगताना दिसतात. चाळीशी पार करूनही शिल्पा शेट्टीचा फिटनेस खर्च वाखाणण्याजोगा आहे. तिने तिच्या शरीराला असे वळण लावले आहे की, ती कुठेही असली तरी व्यायामाशिवाय ती झोपत नाही. त्यामुळेच वयाच्या या टप्प्यातही तिने तिचा फिटनेस जपला आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणारी शिल्पा अनेकदा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. या व्हिडिओमुळे तिला कमालीची प्रसिद्धी देखील मिळते.

नुकताच शिल्पाने तिच्या व्यायामाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर, फॅन्समध्ये खूपच चर्चेचा विषय बनला आहे. शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एयरपोर्ट शटलमध्ये पुशअप्स, लंजेस आणि पुलअप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाचा सेमी फॉर्मल ड्रेस घातला असून, डोळ्यावर गॉगल आणि मोकळ्या केसांमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत आहे. शिल्पाने शेअर केलेला हा व्हिडिओ सर्वांसाठीच एक प्रेरणा बनताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मंडे मोटिव्हेशन (सोमवारची प्रेरणा)…हे याच्यासाठी कारण बस रिकामी होती तर रस्त्यात थोडे पुल अप्स, लंजेस आई पुश अप्स करून घेतले…दोन मिशन पूर्ण झाले. फिट इंडिया मुव्हमेंट आणि स्वच्छ भारत अभियान.” यासोबतच तिने तिच्या व्हिडिओला आणि कॅप्शनला जुळणारे अनेक हॅशटॅग देखील दिले आहेत.” शिल्पा शेट्टी चित्रपटांमध्ये जरी खूप कमी दिसत असली तरी ती टेलिव्हिजनविश्वात मात्र कमालीची सक्रिय आहे. ती विविध रियॅलिटी शोमध्ये परीक्षकांची धुरा सांभाळत असते.

तत्पूर्वी शिल्पाने नुकताच ‘शेप ऑफ यू’ नावाचा एक शो होस्ट केला होता. ज्यात अनेक सेलिब्रिटी येऊन त्यांच्या फिटनेसबद्दल चर्चा करायचे. काही दिवसांपूर्वी शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये परीक्षक म्हणूनही दिसली होती. लवकरच शिल्पा रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसिरीजमध्ये दमदार भूमिकेत दिसेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा