Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

महेश बाबूच्या वक्तव्यावर भडकले निर्माते राम गोपाल वर्मा, ‘बॉलिवूड काही कंपनी नाही’ म्हणत टोचले कान

सध्या सिनेजगतात हिंदी भाषेवरून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य  कलाकारांमध्ये चांगलाच वाद रंगल्याचे दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेमांना मिळणारे यश आणि बॉलिवूडच्या चित्रपटांवर केली जाणारी टिका यामुळेच या वादाला चांगलाच रंग आला असून दाक्षिणात्य सिने जगतातील अनेक कलाकार बॉलिवूडवर टिका करताना दिसत आहेत, तर बॉलिवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक आणि अभिनेतेही त्यांना जोरदार प्रत्युतर  देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) मी बॉलिवूडला परवडणार नाही अशा प्रकारचे विधान केले होते. आता त्याच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक राम गोपाल वर्माने (Ram Gopal verma) सडेतोड उत्तर दिले आहे. 

गेले अनेक दिवसांपासून हिंदी भाषेवरून दाक्षिणात्य कलाकार आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपने केलेल्या एका वक्तव्यावरून हा सगळा वाद सुरू झाला होता. हिंदी भाषेला राजभाषा समजण्याची गरज नाही असे वक्तव्य त्याने केले होते. त्यावर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्याचसोबत महेश बाबूने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडला मी  परवडणार नाही असे वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले होते. त्याच्या याच वक्तव्यावर निर्माता  राम गोपाल वर्माने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

याबद्दल एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा म्हणाले की, “महेश बाबूने आजपर्यंत चित्रपटातून जितके पैसे मिळवले आहेत, ते सगळे चित्रपट हिंदीमध्ये डब करुन मिळवले आहेत. त्याचप्रमाणे अलिकडच्या काळातील दाक्षिणात्य सिनेमांचे यश पाहिले तर त्यांनी चित्रपटांना हिंदीमध्ये डब केल्यानंतर मिळवलेले यश आहे.त्यामुळे हिंदी भाषेबद्दल बोलण्याता काहीही अर्थ नाही.”

महेश बाबूच्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “कोणत्या चित्रपटात काम करायचे हा त्याचा प्रश्न आहे पण यामध्ये बॉलिवूडचा काहीही संबंध नाही. कारण बॉलिवूड ही एक कंपनी नाही तर लोकांनी प्रेमाने दिलेले नाव आहे. तसेच तुम्हाला एखादी प्रोडक्शन कंपनी चित्रपटात घेत असते त्यामुळे त्याच्या वक्तव्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.” दरम्यान महेश बाबूच्या या वक्तव्यावर अभिनेता सुनील शेट्टीनेही जोरदार टिका केली होती.

हे देखील वाचा