×

महेंद्रसिंग धोनी करणार नव्या इनिंगला सुरूवात, ‘या’ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत करणार चित्रपटाची निर्मिती

आपल्या धमाकेदार बॅटिंगने आणि शांत, संयमी नेतृत्व कौशल्याने विरोधकांना घाम फोडणारा कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) खास ओळख आहे. क्रिकेटच्या मैदानावर आत्तापर्यंत यशस्वी कारकीर्द पार पाडल्यानंतर आता तो लवकरच चित्रपट निर्मितीमध्ये छाप पाडायला तयार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे आता त्याच्या क्रिकेट प्रेक्षकांना त्याच्या या नव्या इनिंगची चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या असामान्य खेळीने क्रिकेट विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. म्हणूनच क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्या नावाची नोंद केली जाते. मैदानावरील त्याच्या डावपेचांचे संयमी नेतृत्व कौशल्याचे जगभरात असंख्य चाहते पाहायला मिळतात. आता धोनीची हिच संयमी, आणि अनोखी शैली क्रिकेटच्या मैदानातून थेट चित्रपट क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. म्हणजेच महेंद्रसिंग धोनी लवकरच एका तामिळ चित्रपटाची निर्मीती करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

महेंद्रसिंग धोनीच्या या चित्रपटामध्ये तामिळ सिने जगताची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा झळकणार आहे. सध्या नयनतारा इतर चित्रपटांच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असल्याने तिने याबाब अधिकृत होकार कळवला नाही. मात्र हा आयपीएलचा हंगाम संपुष्टात आल्यानंतर लवकरच तो याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना त्याच्या या नव्या इनिंगची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

याआधीही महेंद्रसिंग धोनी आणि दाक्षिणात्य सिने जगताचा चांगलाच संबंध पाहायला मिळाला आहे. महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटाला याच दाक्षिणातील राज्यांमध्ये जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. तसेच महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहतावर्गही त्या राज्यांमध्ये आहे त्यामुळेच आता धोनीच्या चित्रपटालाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post