सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. अभिनेत्रीकडे अनेक चित्रपट आहेत. तसेच कंगना तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच कंगना पहिल्यांदाच ओटीटीवर रियॅलिटी शो ‘लॉकअप’ होस्ट करताना दिसली होती. कंगनाचा हा शो सुपरहिट ठरला. अशातच आता कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पुन्हा पुन्हा किस करताना दिसली कंगना
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये कंगना एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून केवळ चाहतेच आश्चर्यचकित झाले नाहीत, तर ज्या व्यक्तीवर कंगना प्रेमाचा वर्षाव करत आहे आणि किस करत आहे, ती व्यक्तीही हैराण झालेली दिसत आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून शिवम शर्मा (Shivam Sharma) आहे, जो ‘लॉक अप’चा स्पर्धक होता. कंगन आणि शिवमची ही बाँडिंग नेटकऱ्यांना खूप आवडली असून, आता या दोघांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. (kangana ranaut gets cozy at party with shivam kangana ranaut rains kiss)
कंगनाने होस्ट केली ग्रॅंड पार्टी
मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याने ‘लॉक-अप’ ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ‘लॉक-अप’मध्ये एकमेकांशी भांडणारे स्पर्धक आता ‘लॉक-अप’च्या सक्सेस पार्टीमध्ये मजा करताना दिसत आहेत. शोच्या पहिल्या सीझनला प्रचंड यश मिळाल्यानंतर, कंगना आणि एकता कपूर (Ekta Kapoor) यांनी एकत्र ग्रॅंड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सर्व सेलेब्स आणि सर्व स्पर्धकांनी हजेरी लावली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा