×

सलमान खानने शेअर केला कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर, ‘पंगा गर्ल’ म्हणाली, ‘थँक्यू मेरे दबंग हिरो’

कंगना रणौतने (kangna ranaut) अलीकडेच दावा केला आहे की ईदच्या पार्टीत सेलिब्रिटींनी ‘धाकड’ चित्रपटाची जोरदार प्रशंसा केली होती परंतु ती सार्वजनिकपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे आणि म्हणूनच मौन बाळगत आहे. कंगनाच्या या विधानानंतर ‘बॉलिवुडच्या भाईजान’ने ते काम केले जे त्याने कंगनासाठी यापूर्वी केले असेल. सलमान खानने कंगना रणौतचा आगामी अॅक्शन चित्रपट ‘धाकड’चा दुसरा ट्रेलर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘धाकड’चा दुसरा ट्रेलर गुरुवारी (११ मे) रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित होताच, सलमान खानने ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आणि कंगना आणि तिच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘धाकड’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये कंगनाचे जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची हॉलिवूड चित्रपटांशी तुलना करत आहेत. चाहते ट्रेलरचे जोरदार कौतुक करत आहेत.धाकडचा हा ट्रेलर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, “टीम धाकडसाठी खूप खूप अभिनंदन.” या पोस्टमध्ये सलमानने कंगना रणौत, अर्जुन रामपाल आणि निर्माता सोहेल मकलाई यांना टॅग केले आहे.

सलमान खानची (salman khan) ही पोस्ट पाहिल्यानंतर कंगना रणौतने आनंदाने उडी घेतली आणि सोशल मीडियावर लगेच त्याचे आभार मानायला विसरली नाही. सलमानच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करताना कंगनाने इन्स्टा स्टोरीवर लिहिले – “धन्यवाद माझा दबंग हिरो, ज्याचे हृदय सोन्यासारखे आहे. या इंडस्ट्रीत मी एकटी आहे असे मी आता कधीच म्हणणार नाही. संपूर्ण धाकड टीमच्या वतीने धन्यवाद.”

सलमान खानशिवाय अॅक्शन हिरो विद्युत जामवाल यानेही कंगनाच्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. व्हिडिओद्वारे त्याने कंगनाचे जोरदार कौतुक केले आहे.

कंगना रणौतचा ‘धाकड’ हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘धाकड’ची टक्कर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’सोबत होणार आहे. आता या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडक मारून लोकांच्या मनावर राज्य करणार हे पाहावे लागेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post