Monday, August 4, 2025
Home टेलिव्हिजन राखी सावंत पडली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, माध्यमांसमोर दिली प्रेमाची जाहिर कबुली

राखी सावंत पडली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, माध्यमांसमोर दिली प्रेमाची जाहिर कबुली

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत असते. बिगबॉस मधील सहभागापासून ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या अतरंगी फॅशन्समुळे तर कधी आपल्या विवादास्पद वक्तव्याने ती सर्वांचेच लक्ष वेधत असते.मात्र सध्या राखीबद्दल एक वेगळीच चर्चा सुरू असून राखी सावंत प्रेमात पडल्याची माहिती समोर आली आहे. या बद्दलचा खुलासा स्वःत राखीने केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोण आहे राखीचा प्रियकर चला जाणून घेऊ. 

राखी सावंतला बिग बॉसमधून एन्टरटेन्मेंट क्वीनचा मुकुट मिळाला आहे. राखी सावंत कायम चर्चेत असते. कधी ती तिच्या वक्तव्यामुळे तर कधी रिलेशनशिपमुळे चर्चेत राहते. बिग बॉसमध्ये राखी सावंतने तिचा पती रितेशशी लोकांना ओळख करून दिली. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत. शोमधून बाहेर आल्यानंतरच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता राखीला पुन्हा प्रेम मिळाले आहे. राखीने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की ती आदिल खान दुर्राणीला डेट करत आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितल्यापासून ती ती चर्चेचा भाग बनली आहे. राखीचा बॉयफ्रेंड आदिलबद्दल जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच आहे.

जेव्हापासून राखीच्या आयुष्यात नवीन प्रेम आले आहे, तेव्हापासून ती आनंदाने खुलून गेली आहे. राखीला तिचा नवा जोडीदार सापडला आहे. राखीने आदिलवरचे तिचे प्रेम खुलेपणाने व्यक्त केले आहे. राखीने आदिलबद्दल सांगितले की तो एक बिझनेसमन आहे. आदिलचा कारचा व्यवसाय आहे आणि याशिवाय तो अनेक व्यवसाय करतो. आदिल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आदिलला वाहनांची खूप आवड आहे. तो त्याच्या वाहनांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान आदिल त्याच्या जिम आणि वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आदिलचे व्हिडिओ पाहून तो फिटनेस फ्रीक आहे असे म्हणता येईल. राखी सावंत पती रितेशसोबत बिग बॉस 15 चा भाग बनली होती. बिग बॉसमध्येच तिने रितेशची प्रेक्षकांशी ओळख करून दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा