Saturday, March 15, 2025
Home अन्य अभिनेत्री छवी मित्तलने सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केला तिचा कॅन्सर सर्जरीनंतरचा संघर्ष

अभिनेत्री छवी मित्तलने सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केला तिचा कॅन्सर सर्जरीनंतरचा संघर्ष

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री छवी मित्तलने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सर्वांना सांगितले होते. त्यानंतर तिची लगेच एक सर्जरी देखील झाली. छवीने तिचा हा संपूर्ण प्रवास तिच्या फॅन्ससोबत आणि सोशल मीडियावरील कुटुंबासोबत शेअर केला. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून ते तिची सर्जरी होईपर्यंत त्यानंतर देखील तिने तिचे सर्व रुटीन नेटकऱ्यांसोबत शेअर केले. आता छवीच्या सर्जरीला जवळपास एक महिना झाला असला तरी अजून देखील ती या सर्जरीच्या दुखण्यातून बरी झालेली नाही. छवीने तिच्या लेटेस्ट पोस्टमधून याबद्दल सर्वांना माहिती दिली आहे. यासोबतच तिने तिचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.

छवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “कालचा दिवस माझा चांगला नव्हता. मला थोडा ताप होता, घास दुखत होता, संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या. खरे सांगायचे तर मला माझी तब्येत खराब असण्यापेक्षा आधी असे आजारी होऊन पडून राहण्याचे जास्त दुःख होत आहे. मी उठली जिमला गेली, परत आली, स्क्रिप्ट लिहिले, माझ्या एका कॅन्सर डॉक्टरला भेटली. त्यांनी मला सांगितले की, मी अशीच बरी होऊ शकते. माझा दिवस ठीक होता.”

पुढे छवीने लिहिले की, “मला माझ्या ऑपरेशनचा एक टाका जास्त त्रास देत आहे. त्यातच जास्त वेदना होत आहे. मला यातून लवकर बाहेर यायचे. मी फिजियोथेरपी देखील घेत आहे. मी विचार करते की हा त्रास लवकर जाईल. मला माझ्या मुलांना याबद्दल माहिती द्यावी लागेल. मात्र मी माझ्या मुलीला सांगू नाही इच्छित की मी किती त्रासात आहे. एक दिवस मी माझ्या मुलीला सांगितले की मला बरे वाटत नाही. ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. तिच्या डोक्यात अनेक प्रश्न होते. तिला जाणून घ्यायचे होते की मला काय झाले. मी तिला सांगितले की जर मी काही दिवस नसली तर ती तिच्या आजीसोबत राहू शकते. आजीसोबत मला भेटायला येऊ शकते. मी तिला कॅन्सरबद्दल सांगितले आहे. ते ऐकून ती रडली देखील.”

तत्पूर्वी छवी मित्तल ही एक अभिनेत्री असण्यासोबतच सोशल मीडिया ब्लॉगर देखील आहे. तिचे यूट्यूब चॅनेल असून यामार्फत ती विविध विषयांवर सर्वांना माहिती देत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा