Sunday, May 24, 2026
Home अन्य धक्कादायक! अवघ्या १५ सेकंदाच्या व्हिडिओसाठी पाकिस्तानी Tiktokerने थेट जंगलाला लावली आग!

धक्कादायक! अवघ्या १५ सेकंदाच्या व्हिडिओसाठी पाकिस्तानी Tiktokerने थेट जंगलाला लावली आग!

टिक-टॉक ऍप शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप लोकप्रिय आहे आणि यामुळे बरेच लोक रातोरात स्टार बनले. सध्या हे ऍप आपल्या देशात बंद करण्यात आले आहे. परंतु अजूनही असे अनेक देश आहेत, जिथे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. खरं तर, एका पाकिस्तानी टिक टॉकरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती जंगलातील आगीच्या भीषण ज्वाळांमध्ये एक व्हिडिओ बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तसेच तिच्यावरही कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

भीषण आगीमध्ये फिरताना दिसली टिक-टॉकर
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तानच्या पसुरी या ट्रेंडिंग गाण्यावर बनवला आहे. व्हिडिओमध्ये टिक टॉकर टशनमध्ये फिरताना दिसत आहे आणि मागच्या बाजूला जंगलात मोठी आग लागली आहे. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे. पण तो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर तिला खरेखोटे ऐकवत आहेत आणि सरकारकडे टिक-टॉकरवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहेत. (pakistani tiktok star faces backlash after she posted video by forest fire)

यूजर्सने केली शिक्षेची मागणी
खरं तर हा व्हिडिओ पाहून समजू शकते की, एका छोट्या व्हिडिओसाठी निसर्गाशी काय खेळ केला जातोय. हे पाहून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यावर बोलताना एका यूजरने लिहिले की, “कृपया संबंधित विभागाला याची माहिती द्या.” त्याचप्रमाणे दुसऱ्या युजरने लिहिले की, “हे गुन्हेगारी वर्तन आहे!!” आणखी एका युजरने लिहिले की, “हिला शिक्षा झाली पाहिजे. तसेच इतर युजर्स देखील शिक्षेची मागणी करताना दिसत आहेत.

हेही वाचा

हे देखील वाचा