Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ज्ञानवापी मस्जिद शिवलिंग दाव्यावर कंगना रणौत म्हणाली…

काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ज्ञानवापी मस्जिद शिवलिंग दाव्यावर कंगना रणौत म्हणाली…

बॉलिवूडची क्वीन कंगणा रणौत (Kangana Ranaut) तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असते. आपल्या दमदार अभिनयाने तिने हिंदी चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अभिनयापेक्षा ती विविध वक्तव्यांनीच नेहमी चर्चेत येत असते. सध्या देशात गाजत असलेल्या वाराणसीमधील मस्जिदीच्या वादात आता कंगणाने उडी घेतली आहे. या वादाबद्दल नेमकं कंगणाने काय म्हणले आहे चला जाणून घेऊ. 

देशात सुरू असलेल्या ज्ञानवापी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना रणौत वाराणसीला पोहोचली आहे. सध्या कंगना राणौत तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या संदर्भात, ती ‘धाकड’च्या टीम आणि कलाकारांसह वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचली जिथे तिने दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. यावेळी या सगळ्या वादाबद्दल तिने आपले स्पष्ट मतही व्यक्त केले आहे. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणाली, “जसे मथुरेच्या प्रत्येक कणात भगवान कृष्ण आहे, अयोध्येच्या प्रत्येक कणात राम आहे, त्याचप्रमाणे काशीच्या प्रत्येक कणात महादेव आहे. त्यांना कोणत्याही रचनेची आवश्यकता नाही. यानंतर कंगनाने हर हर महादेवचा नारा दिला.” अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आजकाल कंगना रणौत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी ती कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचली होती. आता ती वाराणसीला पोहोचली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती काशी विश्वनाथ मंदिरात आरती करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत सहकलाकार अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील उपस्थित होते. या चित्रपटात कंगनाने जबरदस्त एक्शन सीन्स केले आहेत ज्याची खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सोबतच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही निर्णय दिला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा