‘माझा मित्र होण्याची ‘त्यांची’ लायकी नाही’, कंगणाने पुन्हा साधला बॉलिवूड कलाकारांवर निशाणा

हिंदी सिने जगतातील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून कंगणा रणौतचे (Kangana Ranaut) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या अभिनयाइतकीच कंगणा तिच्या विवादित वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशातील कोणत्याही मुद्द्यावर कंगणा आपले मत व्यक्त करत असते ज्यामुळे तिला अनेकदा नेटकऱ्यांच्या रोशालाही सामोरे जावे लागले आहे. सध्या आपल्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या कंगणाने बॉलिवूड जगताबद्दल नवा खुलासा केला आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काय म्हणाली ते नेमकं चला जाणून घेऊ. 

View this post on Instagram

A post shared by Kangana Dhaakad (@kanganaranaut)

कंगणा राणौत सध्या तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत तिला कोणीही मित्र नाही. बॉलीवूडमधील कोणत्याही व्यक्तीला तिच्या घरी बोलावणे तिला आवडणार नाही, असा नवा खुलासा तिने केला आहे ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतलेल्या एका मुलाखतीत कंगणाने हा धक्कादायक खुलासा केला आहे. मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले की ती बॉलीवूडमधील कोणत्या तीन लोकांना रविवारच्या जेवणासाठी आमंत्रित करशील. यावर उत्तर देताना कंगनाने बॉलिवुडमधून यासाठी कोणीही लायक नाही, असे धक्कादायक विधान केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Dhaakad (@kanganaranaut)

कंगणाला या मुलाखतीत विचारले की, “तिचा बॉलिवूडमध्ये एकही मित्र नाही का?” यावर कंगणाने तात्काळ नाही असे उत्तर देत हे लोक माझे मित्र होण्यासाठी योग्य नाहीत. त्यांना पात्रता हवी,” असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यांनाही सिने जगतात बहिष्कृत केले जाते असे म्हणले आहे. दरम्यान कंगना राणौत लवकरच ‘धाकड’ या एक्शन थ्रिलर चित्रपटात एजंट अग्निच्या भूमिकेत दिसणार आहे. रजनीश घई दिग्दर्शित या चित्रपटात कंगनाशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 20 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कंगना लवकरच ‘मणिकर्णिका रिटर्न्स’, ‘तेजस’ आणि ‘द इनकारनेशन: सीता’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post