Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

ब्रेकिंग | सिनेसृष्टी बुडाली शोक सागरात, प्रसिद्ध अभिनेत्याचे दुखःद निधन

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते बो हॉपकिंस (bo hopkins) यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण हॉलिवूड जगताला मोठा धक्का बसला आहे. बो हॉपकिंस यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हो हॉपकिंस यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला असून आपल्या भावना त्यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या आहेत. 

अभिनेते बो हॉपकिंस यांच्या निधनाची अधिकृत बातमी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ज्यामध्ये अत्यंत दुखद भावनांनी सांगावे लागत आहे की अभिनेते बो हॉपकिंस यांचे निधन झाले आहे. अशा प्रकारचा संदेश देण्यात आला आहे. या  बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेते बो हॉपकिंस यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांना खरी लोकप्रियता आणि ओळख त्यांच्या अमेरिकन ग्राफिटी’  या कॉमेडी चित्रपटाने मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते.

द वाइल्ड बंच या चित्रपटातून अभिनेते बो हॉपकिंस यांनी १९६९ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. या चित्रपटात त्यांनी क्रेझी ली ही व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर त्यांनी गेटअवे या चित्रपटात भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात त्यांनी साहायक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट १९७२ ला प्रदर्शित झाला होता. ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मैन हू लव्ड कैट डांसिंग’, ‘मिडनाइट एक्सप्रेस’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. चित्रपटात येण्याआधी त्यांनी युएस सैन्यात सेवाही बजावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा