Sunday, June 4, 2023

B’day special| सून म्हणून मृण्मयीच होती स्वप्नीलच्या वडिलांची पहिली पसंती; अशी आहे तिच्या लग्नाची गोड कहाणी

स्टार प्रवाह या वहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. (mrunmayee deshpande) ‘कुंकू’ (kunku)या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयीने शनिवारी (29 मे) तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…

मृण्मयी देशपांडे हिचा जन्म 29 मे, 1988 साली पुण्यामध्ये झाला. तिचे बालपण पुण्यातच गेले. अभिनयाची आवड असल्याने ती मुंबईला रवाना झाली आणि तिथूनच तिच्या आयुष्याला मार्ग मिळाला. उत्तम जीवनसाथी देखील इथेच मिळाला. मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत क्यूट जोडपे आहे. ते दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे रोमँटिक आणि मजेशीर फोटो ते नेहमीच प्रेक्षकांसाठी शेअर करत असतात.

मृण्मयी आणि स्वप्नील यांनी 3 डिसेंबर, 2016 रोजी लग्न केले आहे. स्वप्नील हा एक व्यावसायिक आहे. खरंतर मृण्मयी आणि स्वप्नीलचे अरेंज मॅरेज आहे. पण त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. स्वप्नीलला जेव्हा लग्नासाठी मुली पाहायला चालू केल्या होत्या, तेव्हा मृण्मयी ही स्वप्नीलच्या वडिलांची पहिली पसंती होती. ती घरात सून म्हणून यावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी स्वप्नीलला सांगितले की, “मृण्मयी दिसायला खूप सुंदर आहे तसेच चांगल्या घरातील मुलगी आहे. तिला एकदा भेटून ये.”

त्यांनतर स्वप्नील देखील म्हणाला ठीक आहे, एकदा भेटायला काही हरकत नाहीये. त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. ते अनेक दिवस फोनवर बोलत होते. त्यांच्यातील संवाद मजबूत झाल्यानंतर त्यांनी भेटायचे ठरवले. भेटल्यानंतर दोघांच्याही आवडीनिवडी, स्वभाव जुळला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

यात ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ या सारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने झी मराठीवरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘अग्निहोत्र’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा