Monday, December 22, 2025
Home बॉलीवूड नायक नही खलनायक! बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक खलनायकांनी आपल्या प्रभावी भूमिकांनी प्रेक्षकांवर सोडली छाप

नायक नही खलनायक! बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक खलनायकांनी आपल्या प्रभावी भूमिकांनी प्रेक्षकांवर सोडली छाप

मागील १०० पेक्षा अधिक वर्षांपासून बॉलिवूडचे सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मनोरंजनामध्ये तसूभरही कमतरता दिसून येत आंही. काळाप्रमाणे बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक बदल दिसून आले. हे बदल केल्यामुळेच सिनेमे आज हिट होतात. पूर्वीच्या काळातील चित्रपटांमधील सर्वात मुख्य व्यक्तिरेखा होती ही खलनायकाची. आज बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायक नसतो आणि असला तरी त्याला नावापुरतेच खलनायक दाखवले जाते. मात्र आधीच्या काळातील बॉलिवूड सिनेमांमधील खलनायक हा नायकावर देखील भारी पडायचा. त्यांचा लूक, अभिनय, अंदाज सर्वच बाबतीत हे खलनायक कमालीचे भाव खाऊन जायचे. चित्रपटांमध्ये मुख्य कलाकारांपेक्षा जास्त खलनायकाचीच चर्चा व्हायची. हे खलनायक खऱ्या आयुष्यात देखील लोकांना घाबरवत इतके क्रूर होते. ८०, ९० आणि २००० च्या दशकात असे काही सिनेमे आले ज्यांनी खलनायकाच्या जोरावर लोकप्रियता मिळवली. काही खलनायकानी अशा पद्धतीने भूमिका रंगवली की आजही त्यांची भूमिका अजरामर असून, त्याच्या अभिनयाचे खरोखऱ कौतुक केले जाते. आज या लेखातून आपण अशाच काही खलनायकांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली.

अमरीश पुरी :

अमरीश पुरी हे नाव उच्चारले तरी खलनायक हेच डोक्यात येते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये खलनायक रंगवला. त्याच्या या खलनायकी भूमिका हिट देखील झाल्या. मात्र १९८७ साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील त्यांची भूमिका ‘मोगॅम्बो’ कमालीची गाजली. यासोबतच त्यांच्या ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा संवाद आजही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. ही भूमिका अमरीश पुरी यांनी अक्षरशः पडद्यावर जिवंत केली.

आशुतोष राणा :

प्रभावी अभिनयासाठी आशुतोष राणा हे ओळखले जातात. टीव्ही, नाटकं, चित्रपट सर्वच माध्यमांमध्ये त्यांनी त्यांच्यात असणारी अभिनयाची प्रतिभा प्रेक्षकांसमोर मांडली. तसे पाहिले तर आशुतोष राणा यांच्या सर्वच भूमिका अजरामर आहे. मात्र त्यांनी १९९९ साली आलेल्या ‘संघर्ष’ सिनेमात लज्जा शंकर पांडे ही मानसिक हत्या करणाऱ्या व्यक्तीची जी भूमिका साकारली ती आजही लोकांच्या लक्षात आहे. अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात अंगावर काटा येईल असे भयानक सीन्स दिले आहेत. या साणमातील त्यांच्या भूमिकेने लोकांना घाबरवले होते.

रज़ा मुराद :

दिग्गज अभिनेते असलेल्या राजा मुराद यांनी जवळपास २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना बॉलिवूड चित्रपटांचा खलनायकी चेहरा म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या खलनायकी भूमिकाही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. १९८९ साली आलेल्या जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या क्लासिक सिनेमा असलेल्या ‘राम लखन’मध्ये रंगवलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. यात त्यांनी सर जॉन ही भूमिका साकारली होती. त्यांचा सिनेमातील लूक देखील भयानक होता. यात त्यांचा एक डोळा काचेचा दाखवला गेला होता.

महावीर शाह :

महावीर शाह यांनी देखील त्यांच्या खलनायकी भूमिकांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये क्रूर खलनायक रंगवला. चित्रपटांमध्ये हिरोच्या प्रियसीचे अपहरण करण्यामध्ये महावीर शाह प्रसिद्ध होते. त्यांनी ८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भ्रष्ट पोलीस अधिकारी देखील साकारला.

यशपाल शर्मा :

यशपाल शर्मा हे देखील बॉलिवूडच्या खलनायकांमधील महत्वाचे नाव आहे. यशपाल नेहमीच त्यांच्या भूमिकांमधून हिरोला त्रास द्यायचा प्रयत्न करायचे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी रंगवलेला खलनायक भाव खाऊन गेला. मात्र २००० साली प्रकाश झा दिगदर्शित आणि अजय देवगण अभिनित ‘गंगाजल’ सिनेमात त्यांनी साकारलेला सुंदर यादव आजही लोकांच्या स्मरणात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा