Engagement | राखी सावंतने नवीन बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, आता करतेय लग्नाची तयारी!

राखी सावंतला (Rakhi Sawant) कॉन्ट्रोव्हर्सी आणि ड्रामा क्वीन म्हटले जाते. गेल्याच दिवशी तिने पोस्ट लिहून पती रितेशसोबत विभक्त झाल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपासून राखीच्या डोक्यावर पुन्हा एकदा ‘लव्ह- फिव्हर’ चढताना दिसतोय. आता राखीसोबत काहीतरी घडलंय आणि इंटरनेटवर धमाका नाही, असे होऊच शकत नाही. राखीने स्वत:शी संबंधित एक चकित करणारी अपडेट दिली आहे.

नुकतेच राखी सावंतने सोशल मीडियावर तिचे प्रेम जाहीर केले होते. तिने चाहत्यांना सांगितले होते की, ती आता सिंगल नाही, तर आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता रिपोर्ट्सनुसार, ड्रामा क्वीनने आदिलसोबत साखरपुडाही केला आहे. खुद्द राखीने एका संवादादरम्यान ही माहिती दिली आहे. तिची एंगेजमेंट रिंग दाखवत ती म्हणाली, ‘वह मेरा प्यार है और यह कोई पब्लिसिटी नहीं है’. (rakhi sawant did engagement adil durrani new boyfriend)

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

तत्पूर्वी, आपल्या नवीन प्रियकराचे कौतुक करताना राखी म्हणाली, “जेव्हा ईश्वर काही देतो, तेव्हा तो छप्पर फाडून देतो आणि देवाने मला दिले आहे. आदिल एक स्वीटहार्ट आहे.” नुकताच राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीसोबत दिसत आहे. यात दोघांचे अनेक फोटो मिळून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी आणि आदिल एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत.

आदिलने राखीला गिफ्ट केली बीएमडब्ल्यू कार
गेल्या महिन्यात राखी एका नवीन बीएमडब्ल्यू कारमध्ये सवारी होताना दिसली होती. तेव्हा राखीने सांगितले की, तिला तिच्या प्रियकर आदिलने ही लक्झरी कार गिफ्ट केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post