Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दक्षिण-बॉलिवूड वादावर अक्षय कुमारचे वक्तव्य; म्हणाला, ‘फोडा आणि राज्य करा’च्या धोरणाने देशात…’

‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ चित्रपटांच्या अफाट यशानंतर, साऊथचा दर्जा बॉलिवूडपेक्षा खूप वाढलेला दिसत आहे. यावरूनच दोन्ही इंडस्ट्रीमध्ये वाद निर्माण झाला आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी संवाद साधताना अक्षयने साऊथ विरुद्ध बॉलिवूडच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि साऊथच्या कलाकारांनीही त्यांच्यासोबत काम करावे, असा सल्ला दिला. तसेच त्याने साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) काम करण्याची इच्छा व्यक्त केली. (akshay kumar talk about south vs bollywood controversy)

दक्षिण आणि बॉलिवूडच्या मुद्द्यावर अक्षय कुमार म्हणाला, “कृपया देशात ‘फोडा आणि राज्य करा’ धोरणे बनवणे थांबवा. दक्षिण आणि उत्तर काही वेगळे नाही, आपण सर्व एक इंडस्ट्री आहोत. आता वेळ आली आहे की, सर्व उद्योगांनी एकत्र येऊन भारतीय प्रेक्षकांसाठी काम केले पाहिजे. अल्लू अर्जुननेही माझ्यासोबत लवकरच काम करावे आणि मी इतर साऊथ कलाकारांसोबतही काम करेन. हाच पुढे जाण्याचा योग्य मार्ग आहे.”

सध्या अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त करत आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे, ज्यात शूर राजा पृथ्वीराज चौहान यांची कथा दाखवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुवेत आणि ओमानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर कतारमध्ये हा चित्रपट होल्डवर ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) ३ जून २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाद्वारे अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा