Tuesday, April 16, 2024

‘मी पत्नीच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही’ अभिनेता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबद्दल केला मोठा खुलासा

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिंदी सिने जगतातील पावरफुल कपल म्हणून ओळखले जातात. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. ते दोन मुलांचे पालक आहेत. मुलगा आरव आणि मुलगी नितारा अशी दोन गोड मुले त्यांना आहेत . ट्विंकल अनेकदा सोशल मीडियावर तिच्या मुलांचे सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल सांगत असते. अक्षय आणि ट्विंकलच्या प्रेमळ नात्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना चांगलेच माहिती आहे. अलीकडेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आणि ट्विंकल खन्नाच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करत असतो. त्याचबरोबर ट्विंकल खन्ना आता पडद्यामागे काम करण्यास प्राधान्य देत आहे. ती बर्‍याच दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर नेहमीच अपडेट राहते. सध्या अक्षय कुमार ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो उद्या म्हणजेच 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याने ट्विंकल आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलताना अनेक खुलासे केले आहेत.

यावेळी बोलताना अक्षयने खुलासा केला की “त्याची आणि ट्विंकलची विचारसरणी वेगळी आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. ‘जेव्हा मी काही विचारतो तेव्हा ट्विंकल मला एक सूचना देते. त्याचवेळी तिने मला लिहिलेला कॉलम वाचायला सांगितला तर मी तो वाचतो आणि एखाद्या गोष्टीवर तिने माझे मत घेतले तर मी देतो. तिने मला विचारले नाही तर मी गप्प बसणे पसंत करतो. मी तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही आणि तीही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही.”

काम आणि खासगी आयुष्याबद्दल बोलताना तो म्हणाला की,” तुम्ही तुमच्या जीवनात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे,”असे सांगत असतानाच शूटिंगदरम्यानचा एक किस्साही अक्षयने सांगितला. त्याने सांगितले की “तो एका गावात शूटिंगसाठी गेला होता, तिथे तो एका शेतकऱ्याच्या घरी चहासाठी गेला होता. ‘त्या शेतकऱ्याचं घर अगदी छोटं होतं, पण घरात सगळीकडे आनंद होता. माझ्या पेक्षा जास्त. तो आनंदी आहे कारण तो कशाचाही ताण घेत नाही. तो सकाळी उठतो, कामावर जातो, मुले जवळच्या शाळेत शिकतात. अशा प्रकारे शेतकऱ्याने आपले जीवन संतुलित केले आहे.” दरम्यान अभिनेता शाहरुख खानच्या आगामी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाची सर्वांनाच जोरदार उत्सुकता लागली आहे.(akshay kumar about her relation with wife twinkle khanna)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

ट्विंकल खन्नाला वाटते अक्षय कुमारच्या ‘या’ गोष्टीची भिती, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा