Friday, December 20, 2024
[aioseo_breadcrumbs]

आयफा अवॉर्ड: हनी सिंगच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली सर्वांची मने, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

पंजाबी गायक यो यो हनी सिंगने (Honey Singh) अलीकडेच अबू धाबी येथे आयफा पुरस्कार 2022 मध्ये हजेरी लावली. या अवॉर्ड शोमध्ये हनी सिंगने त्याच्या पुनरागमनाबद्दल घोषणा केली की तो त्याची 10 नवीन गाणी लवकरच समोर आणणार आहे. हनी सिंगचे इतकंच बोलणं घ्या आणि बाकीच्या पंजाबी गायकांचा घाम सुटला. सर्वांना आश्चर्य वाटले. आयफा अवॉर्ड्समध्ये हनी सिंगने गुरु रंधवासोबत स्टेजवर परफॉर्म केले. या कार्यक्रमात हनी सिंगच्या एका कृतीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी हनी सिंगचे कौतुक करत आहेत.

सध्या गायक हनी सिंगच्या एका कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. आयफा अवॉर्डमध्ये एआर रहमान समोरच्या सीटवर बसले होते. हनी सिंग स्टेजवरून खाली आला आणि एआर रहमानच्या पायावर डोकं ठेवलं. एआर रहमानने हनी सिंगला हाताला धरुन वर उचलले पण सर्व लोकांसमोर हनी सिंगने या लोकप्रिय गायकाचे आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही हनी सिंगचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना हनी सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आयुष्यातील खास क्षण, तोही एआर रहमान सरांसोबत.”हनी सिंगच्या या पोस्टवर त्याचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हनी सिंगचे कौतुक करताना एका चाहत्याने “किंग इज बॅक” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकाने “सर आम्ही तुमच्या गाण्याची वाट पाहत आहोत. तुम्ही लवकर गाणी तयार करा अशी विनंतीच केली आहे,” हनी सिंग आयफा अवॉर्ड्समध्ये एआर रहमानच्या पाया पडल्यामुळे नव्हेतर तर गळ्यात घातलेल्या आकर्षक नेकपीसमुळेही प्रसिद्ध झाला. आयफा अवॉर्ड्सबद्दल सांगायचे तर, संगीत क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली. त्यात नेहा कक्कर, तनिष्क बागची, हनी सिंग, गुरु रंधावा, संगीतकार देवी श्री प्रसाद आणि ध्वनी भानुशाली यांच्या नावांचा समावेश आहे.

आयफा पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांनी स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स दिला. काही काळापूर्वी हनी सिंगने सोशल मीडियावर त्याच्या बायसेप्स आणि खांद्याचा फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो अगदी फिट दिसत होता. हनी सिंगचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा