Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड फॅमिली असावी तर अशी! मॉलमध्ये डान्स करणाऱ्या कुटूंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

फॅमिली असावी तर अशी! मॉलमध्ये डान्स करणाऱ्या कुटूंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करायला सगळ्यांनाच आवडते आणि आजकाल अशा डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले जातात आणि लाईक केले जातात. लोक रील बनवतात. लोक घराबाहेर, समुद्राजवळ किंवा मॉलमध्ये कुठेही डान्स व्हिडिओ बनवतात आणि चाहतेही त्यांच्या या व्हिडिओंना खूप प्रेम देतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोंडस भाऊ आणि बहीण आपल्या वडिलांसोबत डान्स करत आहेत. दोन्ही भावंडं बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. तिघांच्याही स्टेप्स खूप जुळतात. त्यांची मस्ती आणि स्टाइल पाहून चाहतेही त्याला भरभरून प्रेम देत आहेत. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

इंटरनेटच्या युगात रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याच व्हिडिओमुळे अनेकजण रातोरात स्टारही झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाऊ बहिण आणि त्यांचे वडील जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. तिघेही मॉलमध्ये गोविंदाच्या ‘तू जो हंस हंस के सनम मुझे बात है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मी जिदान मेरी जान नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबत ” 5.2 मिलियन व्ह्यूज 264k लाईक्स. या रीलला इतके प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,” असा कॅप्शनही देण्यात आला आहे.

हे गाणे गोविंदा आणि आरती छाब्रिया यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि ते त्यांच्या काळातील हिट गाणे आहे. या मुलांची आई असलेल्या तन्नोच्या वर्ल्डच्या इंस्टा पेजवरूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मुलाचे नाव झिदान शाहिद आहे आणि झिदान अनेकदा आपल्या वडिलांसोबत आणि आईसोबत डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतो जे इंस्टा वर व्हायरल होतात. त्याने आपल्या इन्स्टा अकाउंटवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. हे कुटुंब बॉलीवूड गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ बनवते आणि त्यांचे व्हिडिओ खूप पसंत केले जातात.

 

हे देखील वाचा