Tuesday, October 6, 2026
Home › अन्य › ‘लिजंड कधीच मरत नाहीत!’ सिद्धू मुसेवालाच्या गाण्याची ‘बिलबोर्ड २००’मध्ये एन्ट्री, चाहते भावूक

‘लिजंड कधीच मरत नाहीत!’ सिद्धू मुसेवालाच्या गाण्याची ‘बिलबोर्ड २००’मध्ये एन्ट्री, चाहते भावूक

मागील महिन्यात २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धूच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारी बातमी समोर येत आहे. सिद्धूच्या एका गाण्याने युट्यूबवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. त्याचे गाणे ग्लोब्स बिलबोर्ड २००च्या यादीत सामील झाले आहे. यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या आठवणीत भावूक झाले आहेत.

शुभदीप सिंग (Shubhdeep Singh) हे सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याचे मूळ नाव होते. सिद्धूच्या ज्या गाण्याची सर्वाधिक चर्चा रंगलीय, त्या गाण्याचे नाव ‘२९५’ असे आहे.

सिद्धूच्या ‘२९५’ (Sidhu Moosewala 295 Song) गाण्याने या आठवड्यात ‘बिलबोर्ड ग्लोबल २०० चार्ट’मध्ये अचानक प्रवेश केला. तसेच, शुक्रवारपर्यंत ते १५४व्या स्थानावर पोहोचले. गायिका केट बुशचे ‘रनिंग अप द हिल’ हे गाणे या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर हॅरी स्टाइल्स, बॅड बनी, लिझो, कॅमिला कॅबेलो, एड शीरन आणि जस्टिन बीबर यांची प्रसिद्ध गाणी देखील आहेत.

युट्यूबवर २० कोटींहून अधिक व्ह्यूज
सिद्धूच्या ‘२९५’ या गाण्याचा व्हिडिओ जुलै २०११ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या गाण्याव्यतिरिक्त म्युझिक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म ‘युट्यूब म्युझिक’वरही हे गाणे धमाल करत आहे. युट्यूबवर ‘२९५’ या गाण्याला तब्बल २० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे ट्रॅक ‘टॉप १०० म्युझिक व्हिडिओ ग्लोबल चार्ट’मध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

वाढतेय सिद्धूच्या गाण्याची लोकप्रियता
‘युट्यूब म्युझिक’च्या ग्लोबल चार्टमध्ये ‘२९५’ हे चौथ्या स्थानी आहे. तसेच, हे प्लॅटफॉर्म ‘टॉप आर्टिस्ट लिस्ट’च्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सिद्धूचे आणखी एक ‘द लास्ट राईड’ हे यादीत वरच्या दिशेने जात आहे. कारण, हे गाणे आता सहाव्या स्थानी आहे. या व्हिडिओला युट्यूबवर आतापर्यंत ७ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

सिद्धू मुसेवालाच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘सो हाई’, ‘सेम बीफ’, ‘द लास्ट राईड’ आणि ‘जस्ट लिसन’ यांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा