रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांबद्दल आपल्याला आपुलकी असते. जर ते आपले आवडते कलाकार असतील, तेव्हा तर ती आपुलकी जरा जास्तच असते. ते आपल्याला जवळचे वाटतात. त्यांना एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्यासोबत फोटो काढावे, त्यांचा ऑटोग्राफ घ्यावा इतकं सारं आपल्याला वाटतं, पण मंडळी हे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यातही असेच असतात का हो? तर इथं फिफ्टी फिफ्टी म्हणावं लागेल. इंडस्ट्रीत अनेक कलाकार असे आहेत, ज्यांना त्यांच्या डाऊन टू अर्थपणासाठी ओळखले जाते, पण काही कलाकार तर हद्दच पार करतात की, त्यांच्याजवळ चाहता फोटो काढायला जरी आला, तरी ते त्यांना वाईट वागणूक देतात. इतकंच नाही, तर काहीजण चाहत्यांना धक्केही देतात. कोणते आहेत ते कलाकार? पाहूया या लेखात.
सैफ अली खान
नव्वदच्या दशकातील रोमँटिक आणि ऍक्शन सिनेमात झळकणारा हिरो सैफ अली खानचा (saif ali khan) या यादीत समावेश आहे. सैफला पाहिलं, तर कधी वाटणारही नाही की, तो खऱ्या आयुष्यात इतका चिडत असेल, पण सगळे कलाकार कुठे कूल असतात? सैफ एकदा कुठेतरी गेलेला असतो, तेव्हा त्याच्या गाडीभोवती चाहते आणि पॅपराजींचा गराडा असतो. ते काय सैफला बघवत नाही. त्याच्या ड्रायव्हरच्या बाजूची काच उघडी असते, तेव्हा तो आपल्या ड्रायव्हरला जे काही म्हणतो, ते कॅमेऱ्यात कैद होते, ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. तो आपल्या ड्रायव्हरला म्हणतो की, “भाईसाब… काच वरती घ्या… रिव्हर्स कर… नाहीतर जोराची पडेल एक.” असंच एकदा तो विमानतळावर जात असतो, तेव्हा चाहता त्याच्यासोबत फोटो घेऊ लागतो, पण सैफ त्याच्याकडे रागाने पाहतो आणि पुढे निघून जातो.
जॉन अब्राहम
आपल्या जबरदस्त बॉडी आणि सिनेमात व्हिलनची धुलाई करण्यासाठी ओळखला जाणारा हिरो म्हणजे जॉन अब्राहम. (john abrahim) आता पडद्यावरच इतका डेंजर आहे म्हणल्यावर खऱ्या आयुष्यातही तो तसा असला तर वावगं वाटू नये. जॉन विमानतळावरून बाहेर येत असतो. आता हिरो आहे म्हणल्यावर चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी येणारंच ना. तसंच जॉनसोबतही झालं. एक चाहता त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी येत असतो, तेव्हाच जॉन त्याला धक्का देत बाजूला करतो. पण यावर नंतर स्पष्टीकरण देत जॉन सांगतो की, “तो व्यक्ती मुलीच्या पुढे येत होता, त्यामुळेच मी त्याला बाजूला केले.” ते जरी चांगलं-वाईट असलं, तरी त्याने धक्का दिल्यामुळे तो चाहता मात्र, खूपच उदास झाला असेल, हे नक्की.
कॅटरिना कैफ
आता हिरोईन आहे म्हणजे राग येत नाही, असं जर तुमच्या डोक्यात येत असेल, तर ते आधी काढून टाका. कारण, कॅटही आपल्या चाहत्यावर चांगलीच तापली होती. ती परदेशात शूटिंग करत असते. शूटिंग संपवून ती जेव्हा हॉटेलवर जात असते, तेव्हा एक महिला जोरजोरात ओरडू लागते की, मला तुझ्यासोबत फोटो घ्यायचाच नाही. तसेच ती कॅटच्या ऍटिट्यूडवरही खूप काही बोलते, जे कॅटरिनाच्या गळ्याखाली उतरत नाही. कॅटरिनाही तिला उलट उत्तरं देऊ लागते. त्यानंतर जवळपास असलेले चाहते तिच्यासोबत फोटो काढतात.
सलमान खान
तसं तर सलमानला 9salman khan)सगळे ‘भाईजान’ म्हणून ओळखतात. पण मंडळी सलमान रिअल लाईफमध्ये चांगलाच रागीट आहे. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आलाय. तो कधी पॅपराजींवर भडकताना, तर कधी मीडियावाल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसलाय. असंच एकदा तो पाहुणा म्हणून गेलेला असतो, तेव्हाच त्याला कुणीतरी उलटं बोलतं. त्यावेळी सलमानचा राग अनावर होतो आणि त्याला मारायला सुटतो, पण सलमानचे बॉडीगार्ड त्याला अडवतात. असा हा ‘भाईजान’ कधी कूल असतो, तर कधी एकदम वायलेंट होतो.
संजय दत्त
संजय दत्तबद्दल (sanjay dutt) तर सर्वांनाच माहितीये. तो नेहमीच आपल्या डॅशिंग स्वभावासाठी ओळखला जातो. त्याला सगळेच संजू बाबा म्हणूून ओळखतात. संजय दत्तही खऱ्या आयुष्यात चाहत्यांवर चिडलेला दिसला आहे. एकदा तो विमानतळावरून बाहेर येत असतो, तेव्हा चाहते त्याच्याभोवती गराडा घालतात आणि फोटो काढण्यासाठी पुढे-पुढे करतात. आता सगळेच जवळजवळ येत असल्यामुळे संजू बाबाही भडकतो. आपल्या रस्त्यात जो येईल त्याला तो धक्का देऊन बाजूला सारतो आणि पुढे जातो, पण तरीही चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढेपुढे येतच राहतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-










