ओटीटीवर कधीच दिसणार नाही जॉन अब्राहम; म्हणाला, ‘मी २९९ मध्ये विकणारा माणूस नाही

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान जेव्हा जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या ओटीटी पदार्पणाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा अभिनेता म्हणाला की तो कधीही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काम करणार नाही. “मी मोठ्या पडद्याचा हिरो आहे आणि मला तिथेच रहायचे आहे. मला काही पैशांसाठी ओटीटीवर जायला आवडणार नाही”, असे बॉलिवूड अभिनेता म्हटला.

एक चित्रपट बंद करून…
तो म्हणाला, “मी मोठ्या पडद्याचा नायक आहे आणि मला इथेच स्वतःला बघायचे आहे. सध्या, मला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारे चित्रपट करायचे आहेत. तसेच, मला २९९ किंवा ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध व्हायचे नाही. मला त्यात समस्या आहे.” (john abraham ek villain 2 actor said he will never make ott debut)

जॉनला आहे ओटीटीची समस्या?
जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की, त्याला ओटीटीची समस्या आहे का? तेव्हा अभिनेता म्हणाला, “निर्माता म्हणून मला ओटीटी स्पेस आवडते. मी ओटीटी प्रेक्षकांसाठी चित्रपट देखील बनवत आहे. परंतु एक अभिनेता म्हणून मी कधीही ओटीटीसाठी काम करणार नाही. मी स्पष्ट आहे की, मला मोठ्या पडद्यावर काम करायचे आहे.”

जॉनने आयुष्मान खुरानाला दिलाय ब्रेक
जॉन अब्राहम केवळ अभिनेताच नाही, तर एक निर्माता देखील आहे. त्याने स्वीकार केले की, तो ओटीटीसाठी चित्रपट तयार करेल. परंतु गोष्ट त्याची येते, तेव्हा त्याला मोठ्या पडद्यावरच चमकायचे असते. जॉन अब्राहम हा सेल्फ मेड स्टार आहे. या अभिनेत्याला इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नाही, पण आज तो अनेक नवोदित अभिनेत्यांचा गॉडफादर बनला आहे. जॉनने आयुष्मान खुरानाला (Ayushmann Khurrana) ‘विकी डोनर’मध्ये अभिनेता म्हणून पहिला ब्रेक दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post