Friday, March 14, 2025
Home मराठी ‘दे धक्का २’ मध्ये अवतरणार नवी शुक्राची चांदणी, सायलीच्या भूमिकेसाठी झाली लोकप्रिय अभिनेत्रीची निवड

‘दे धक्का २’ मध्ये अवतरणार नवी शुक्राची चांदणी, सायलीच्या भूमिकेसाठी झाली लोकप्रिय अभिनेत्रीची निवड

अभिनेता मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) आणि सिद्धार्थ जाधव (Sidharth Jadhav) यांच्या तुफान कॉमेडिने ‘दे धक्का’ चित्रपट प्रचंड गाजला होता. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जोरदार यश मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटाची कथा तर गाजलीच पण त्याचबरोबर चित्रपटातील उगवली शुक्राची चांदणी या गाण्यानेही प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले होते. आता पुन्हा एकदा दे धक्का चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु दे धक्का २ चित्रपटातील सायली म्हणजेच गौरी वैद्य ही भूमिका साकारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता तिची भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला देण्यात येणार आहे.

‘दे धक्का २’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. दे धक्का चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव अशा सगळ्याच कलाकारांनी चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळेच आता या चित्रपटातही तिच कलाकार मंडळी असणार का असाच प्रश्न चाहत्यांंना पडला होता.

https://www.instagram.com/p/CdAfuPFpvYd/?utm_source=ig_web_copy_link

‘दे धक्का २’ चित्रपटामध्ये आधीच्या चित्रपटातीलच सर्व कलाकार असणार आहेत. फक्त सायली म्हणजेच गौरी विद्यच्या जागी गौरी इंगवले ही भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या चित्रपटातील सायलीच्या भूमिकेत सर्वांची मने जिंकणारी गौरी विद्य शध्या अभिनय जगतात कार्यरत नसून ती इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यामुळेच या चित्रपटात ती काम करणार नाही. तिच्या जागी आता गौरी इंगावलेची निवड करण्यात आली आहे. गौरी इंगावलेने बालकलाकार म्हणून काम केले असून जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत ती कुटूंब चित्रपटात झळकली होती. दरम्यान दे धक्का २ हा बहुचर्चित चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा