प्रदर्शनाआधीच वादात सापडला ‘जुग जुग जियो’ चित्रपट, कथा चोरल्याच्या गंभीर आरोपानंतर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

करण जोहरचा (Karan Johar) आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रांची येथील लेखकाने करणवर चित्रपटाची कथा कॉपी केल्याचा आरोप केला होता. नुकतेच रांची सिव्हिल कोर्टाने या चित्रपटावरील कॉपीराइट प्रकरणी आदेश दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे प्रदर्शन न्यायालयात केले जाईल. या बातमीने चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘जुग जुग जियोचित्रपटाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे. चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर,नीतू कपूर अशा अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.परंतु आता या चित्रपटाबद्दल धक्कादायक बातमी समोर असून चित्रपटावर कथा चोरीचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रांचीचे लेखक विशाल सिंह यांनी करण जोहरवर आरोप केला आहे की, ‘जुग्जुग जिओ’चा कंटेंट त्याच्या ‘पानी रानी’ या कथेसारखाच आहे. त्याला श्रेय न देता त्याची कथा चित्रपटात वापरण्यात आल्याचे विशालने सांगितले. इतकेच नव्हेतर त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तसेच दीड कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे.

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट न्यायालयात प्रदर्शित केला जाईल. ‘ जुगजुग जिओ’ने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले आहे की नाही, हे न्यायमूर्ती एमसी झा चित्रपट पाहिल्यानंतर ठरवतील. दोन्ही बाजूंचा युक्तिवादही न्यायालय विचारात घेणार आहे. याशिवाय पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकनेही करण जोहरवर त्याचे गाणे चोरल्याचा आरोप करणारी पोस्ट शेअर केली आहे. अबरारने लिहिले की, “मी माझे ‘नच पंजाबन’ हे गाणे कोणत्याही भारतीय चित्रपटाला विकले नाही. मी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात जाण्यासाठी हक्क राखून ठेवले आहेत. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी गाण्यांची कॉपी करू नये. हे माझे 6 वे गाणे आहे.” ज्याची कॉपी केली जात आहे. ज्याला अजिबात परवानगी दिली जाणार नाही.”

https://www.instagram.com/tv/Cd2wexDg_Nu/?utm_source=ig_web_copy_link

अबरारचे ‘नच पंजाबन’ हे गाणे 2000 मध्ये आले होते. हे गाणेही त्यावेळी खूप गाजले होते. अबरार हा व्यवसायाने गायक, गीतकार आणि राजकारणी देखील आहे. त्याला किंग ऑफ पाकिस्तानी पॉप ही पदवीही मिळाली आहे. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’मध्ये वरुण-कियारा व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल आणि टिस्का चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Post