सिनेसृष्टीतून धक्कादायक बातम्या येतच आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. टीव्ही आणि सिनेमा जगतातून वाईट बातमी येत आहे. ओडिया अभिनेत्री रश्मिरेखा ओझा हिने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. १८ जूनच्या रात्री ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील राहत्या घरी अभिनेत्री रश्मिरेखा हिचा मृतदेह सापडला. यानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप लावले आहेत.
फक्त २३ वर्षांची होती अभिनेत्री
हाती आलेल्या वृत्तानुसार, रात्री जवळपास साडे दहा वाजता २३ वर्षीय रश्मिरेखा ओझा (Rashmirekha Ojha) हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळताच, घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत लगेच तपास सुरू केला. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेत्रीच्या घरातून एक सुसाईड नोटही मिळाली आहे.
अभिनेत्रीच्या भाड्याच्या घरातून सापडली सुसाईड नोट
माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्री ही भुवनेश्वर येथील नायापल्ली भागात भाड्याच्या घरात राहत होती. याच घरात तिने आत्महत्येचं मोठं पाऊल उचललं. पोलिसांना यादरम्यान तपासात सुसाईड नोटही सापडली. वृत्तानुसार, सुसाईड नोटमध्ये असे लिहिले आहे की, तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. मात्र, अभिनेत्रीने उचललेल्या या मोठ्या पावलामागील कारण मात्र अद्याप कुणालाही समजले नाही. तरीही तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे.
अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच यामागील कारणांचा खुलासा होईल. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, “शनिवारी तिने माझ्या फोनचे उत्तर दिले नाही. यानंतर संतोषनेच आम्हाला रश्मिरेखाच्या निधनाची बातमी दिली. आम्हाला घरमालकाकडून समजले की, दोघेही पती-पत्नीसारखे राहायचे. आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते.”
अभिनेत्री रश्मिरेखा हिच्या अभिनयाबाबत बोलायचं झालं, तर तिला ‘केमिती कहिभी कहा’ या उडिया मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-