Tuesday, April 16, 2024

सलनाननेही ठेवले रणबीरच्या पावलावर पाऊल; ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये दिसणार ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पूजा हेगडेही (Pooja Hegde) सलमान खानसोबत हैदराबादमध्ये शूटिंग करत आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये राम चरणही (Ram Charan) पाहायला मिळू शकतो. मात्र, मेगा स्टार राम चरण या चित्रपटातील भूमिका खूपच छोटी असणार आहे.

‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये राम चरणचा कॅमिओ
खरंतर हैदराबादमध्ये सलमान खान अभिनेत्री पूजा हेगडेसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’च्या ‘लार्जर दॅन लाइफ’ गाण्याचे शूटिंग करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्याचे शूटिंग पाहण्यासाठी आणि सलमानला भेटण्यासाठी राम चरण देखील सेटवर पोहोचला. यानंतर सलमान खानने निर्मात्यांना सल्ला दिला आहे की, या गाण्यात राम चरणला घ्यावे का? जे या गाण्यासाठी आणि चित्रपटासाठी फायदेशीर ठरेल. यावर राम चरणनेही मान्यता दिली. ज्याच्या अंतर्गत चाहत्यांना यात साऊथ सिनेसृष्टीतील स्टार राम चरणची झलक पाहता येईल. (ram charan likely to play cameo role in salman khan kabhi eid kabhi diwali)

सलमानच्या चित्रपटात दिसणार ‘हे’ स्टार्स
जर राम चरण देखील सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’चा एक भाग बनला, तर या मेगा स्टार चित्रपटात आणखी एक अभिनेता सहभागी होईल. कारण राम चरणच्या आधी शहनाज गिल (Shehnaaz Gill), जस्सी गिल (Jassie Gill) यांसारखे मोठे कलाकार यात असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशा परिस्थितीत, सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये राम चरणला पाहणे चाहत्यांसाठी खूप मनोरंजक असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा