बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोनमचे बेबी बंप प्लॉंन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या फोटोंवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. नुकतीच सोनम कपूरने खास पार्टीही आयोजित केली होती ज्यामध्ये सिने जगतातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. सोनम कपूर प्रमाणेच अभिनेते अनिल कपूरही (Anil Kapoor) आजोबा होण्यासाठी चांगलेच उत्सुक झाले आहेत. परंतु त्याआधी अनिल कपूर यांनी सोनम कपूर घरी येणार म्हणले की माझी पंचायत होते असे म्हणले आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण चला जाणून घेऊ.
सोनम कपूर ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. उद्योजक आनंद अहुजासोबत लग्न केल्यानंतर सोनमने सिने जगतापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सोनम तिच्या प्रेग्नेंसीमुळे सर्वत्र चर्चेत आहे. लवकरच ती वडील अनिल कपूर यांच्या घरी येणार असल्याने सोनमच्या स्वागताची जोरदार तयारी अनिल कपूर यांनी केली आहे.सोनम कपूरचे वडील अभिनेते अनिल कपूर बाळाच्या आगमनाच्या तयारीसाठी खूप उत्सुक आहेत. त्यांनी सांगितले की, सध्या मुंबईतील घरी या छोट्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. ‘संपूर्ण घर जोरात तयार होत आहे. याची सर्व जबाबदारी सुनीताने घेतली आहे. संपूर्ण घर बदलले आहे. माझ्यासाठी थोडी जागा ठेवली आहे.
याबद्दल पुढे बोलताना अनिल कपूर यांनी सांगितले की, ” खरे आहे की मला सोनम घरात आल्यानंतर माझ्यासाठी जागा शोधावी लागते. कारण ही खोली तिने घेतली. ही खोली आनंदची आहे अशीच उत्तरे येत असतात. त्यामुळे मी वैतागुन मग मी कुठे झोपू असे विचारल्यानंतर तुम्ही सोफ्यावर जागा बघा असे सांगितले जाते. आणि हेच खरे आहे,” आपण आजोबा होणार याबद्दल कसे वाटते असाही प्रश्न अनिल कपूर यांना विचारण्यात आला.
https://www.instagram.com/p/CcQLwnGKYed/?utm_source=ig_web_copy_link
याबद्दल अनिल कपूर यांनी सांगितले की, “जेव्हा मी पहिल्यांदा आजोबा होणार असल्याचे ऐकले तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण जसजसा वेळ जवळ येत आहे तसतसं मला थोडं टेन्शन येत आहे. मी फक्त प्रार्थना करत राहते की सर्वकाही चांगले होईल. अस्वस्थताही वाढत आहे. एक मिश्र भावना आहे, ज्याचे वर्णन करणे शक्य नाही,” दरम्यान अभिनेते अनिल कपूर सध्या आपल्या जुग जुग जियो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात ते एका वडिलांच्या भूमिकेत आहे जो लग्नाच्या 30 वर्षानंतर घटस्फोटाचा विचार करतो. या चित्रपटात अनिलसोबत नीतू कपूर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा-
- She Season 2 | यूट्यूब व्हिडिओवरून सापडला ‘शी’चा खतरनाक व्हिलन! छंद दोनच, जंगलात शेती अन् चित्रपटात काम
- दाक्षिणात्य सौंदर्यवतीचा थायलंडमध्ये हनीमून, नयनतारा आणि विघ्नेश यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर समंथाने दिली चैतन्यच्या नव्या नात्यावर प्रतिक्रिया; म्हणाली, ‘हे खरं पाहिजे’