Sunday, May 19, 2024

सोनम कपूरच्या मॅटर्निटी शूटची होतोय सोशल मीडियावर चर्चा, एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची (Anil Kapoor) लाडकी सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. हा आनंद तिला अजिबात लपवता येत नाही आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूरची नुकतीच आलेली पोस्ट याचा पुरावा देत आहे.

अलीकडेच सोनम कपूरचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती बहीण रिया कपूरसोबत लंडनमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो सोनम कपूरची बहीण रिया कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनम उघडपणे तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री क्रॉप टॉप आणि मॅटर्निटी पँटमध्ये दिसत आहे. सोनमने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी जॅकेटचा सहारा घेतला आणि इतरांप्रमाणे तिने तिचा बेबी बंप लपवला नाही तर तो अतिशय सुंदरपणे दाखवला. नेटिझन्स फोटोवर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

सोनम कपूर दररोज तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो शेअर करत असते. गरोदरपणातही तिची फॅशन अप्रतिम आहे. सोनम कपूरला तिच्या लूकमध्ये फ्यूजनचा टच घालायला आवडते. अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्सला नाट्यमय टच देऊन अगदी साधा लुक सुपर क्लासी बनवते.

सोनम कपूरने 2018 साली बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. तेव्हापासून अभिनेत्रीची चित्रपटांमधील उपस्थिती कमी झाली होती. लग्नानंतर सोनम तिचा पती आनंदसोबत लंडनमध्ये जास्त वेळ घालवू लागली. त्याच वर्षी तिने तिच्या चाहत्यांना ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली.त्यानंतर सोनमने मातृत्वाचे फोटो शेअर करताना एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिने तिच्या बाळाच्या स्वागताचा उल्लेख केला आणि तिची उत्सुकता व्यक्त केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा