Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री स्पृहा जोशीने केली चाहत्याची मागणी पूर्ण,डेक्कन क्विनची सुंदर कविता होतेय व्हायरल

अभिनेत्री स्पृहा जोशीने केली चाहत्याची मागणी पूर्ण,डेक्कन क्विनची सुंदर कविता होतेय व्हायरल

स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी सिने जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पृहाच्या चित्रपटांची तसेच अभिनयाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. चित्रपटांइतकीच स्पृहा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. ज्यावरुन ती नेहमीच विविध पोस्ट तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या युट्यूबवर स्पृहाच्या कवितेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने दख्खनची राणी नावाची कविता सादर केली आहे. 

स्पृहा जोशी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर ती एक सुंदर कवयित्री म्हणूनही ती लोकप्रिय आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरुन ती नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर करत असते. स्पृहाच्या या कवितांना चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असतो. नुकताच स्पृहाच्या कवितेचा आणखी एक नविन व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी स्पृहाने चाहत्यांच्या मागणीवरुन दख्खन राणी या विषयांवरील सुंद कविता सादर केली आहे. फर्माइश या खास भागातील स्पृहाचा हा व्हिडिओ सोशल  युट्यूबवर सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

कविवर्य वसंत बापट यांचीही कविता स्पृहाने खास तिच्या अंदाजात सादर केली आहे. डेक्कन क्विन या ट्रेनवरील ही सुंदर कविता आहे. ही ट्रेन १९३० मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठीच या ट्रेनचा वापर करण्यात येत होता. याबद्दलची माहिती स्पृहाने तिच्या या कवितेच्या सुरूवातीला दिली आहे. त्याचबरोबर स्पृहाने या ट्रेनला तब्बल ९० वर्ष पुर्ण झाल्याचेही सांगितले आहे.

या सुंदर कविवेत स्पृहा म्हणते की, “दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत ,सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे, ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत, दख्खन राणी ही चालली खुशीत” या ओळींतून या ट्रेनचे सुंदर वर्णन केलेले पाहायला मिळत आहे.

कवितेच्या पुढच्या ओळींमध्ये “निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश, मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात, दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भाली रानाचीच वेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल,” या शब्दात निसर्गाचेही सुंदर वर्णन केले आहे. स्पृहाच्या या कवितेने रसिकांना चांगलीच भुरळ घातली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा