Thursday, April 25, 2024

स्पृहा जोशीचा खजिना स्पेशल एपिसोड, प्राण्यांचे अनाथाश्रम काढणाऱ्या गणराज जैन यांच्या रंजक कथा ऐकून व्हाल थक्क

स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने स्पृहाने सिने जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पृहाने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाप्रमाणेच स्पृहा तिच्या सुंदर कवितांसाठीही चांगलीच लोकप्रिय आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. कधी कविता तर कधी खादाडीचा विशेष भाग ती युट्यूब चॅनेलवरुन प्रसारित करत असते. सध्या स्पृहाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या खजिना या स्पेशल भागाचा नवीन एपिसोड प्रदर्शित केला आहे. स्पृहाच्या या नवीन खजिनाच्या एपिसोडमध्ये तिने पाणवठा फाउंडेशनचे संस्थापक गणराज आणि डॉ. अर्चना जैन यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी अर्चना जैन यांचे प्राण्यांबद्दलचे अनेक गमतीदार, थरारक अनुभव सांगितले आहेत. पाणवठा संस्थाही अनाथ प्राण्यांसाठी, जखमी प्राण्यांसाठी काम करणारी एक संस्था आहे. ज्याची स्थापना गणराज जैन यांनी केली आहे. त्यांचा हाच थक्क करणारा प्रवास स्पृहाने या व्हिडिओमधून मांडला आहे.

स्पृहाच्या या व्हिडिओमध्ये गणराज आणि अर्चना यांच्यासोबत रंगलेल्या गप्पा या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. ज्यामध्ये गणराज जैन यांनी त्यांच्या पाणवठा संस्थेची स्थापना कशी झाली. प्राण्यांबद्दलचे त्यांचे प्रेम कसे तयार झाले आणि प्राण्यांसाठी  आश्रम काढताना त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. याबद्दलच्या अनेक रंजक, थरारक, आणि प्रेरणादाई प्रवास याबद्दलचे अनेक किस्से सांगितले आहेत. जे ऐकताना अभिनेत्री स्पृहाच्याही अंगावर काटा आल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा