Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ऋतिकच्या गर्लफ्रेंडच्या देसी लूकवर एक्स पत्नीही फिदा; कौतुकाचे पूल बांधत म्हणाली, ‘तू खूपच…’

जगभरातील सर्वात हँडसम अभिनेत्यांमध्ये ज्या बॉलिवूड अभिनेत्यांची गणना होते, त्यापैकी एक म्हणजे सुपरस्टार ऋतिक रोशन होय. ऋतिक रोशन त्याच्या लूक्स आणि सिनेमांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेचा धनी ठरतो. सध्या तो चर्चेत आहे, त्यामागील कारण म्हणजे त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद. या दोघांच्याही अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. ते दोघे कधी लंच डेटवर, तर कधी एकत्र फिरताना दिसतात.

इतकेच नाही, तर सबा आझाद (Saba Azad) यापूर्वी ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याच्या घरीही गेली होती. तिथे तिने त्याच्या कुटुंबासोबत काही वेळ घालवला. अशात सबाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सबा भारतीय लूकमध्ये दिसत आहे. हे पाहून ऋतिकची एक्स पत्नीदेखील घायाळ झाली आहे. तिने कमेंट करत सबाचे कौतुक केले आहे.

सुझेनने केली सबाची प्रशंसा
खरं तर, नुकतेच सबाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिचा लूक पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. यावर ऋतिकची एक्स पत्नी सुझेन खान (Sussanne Khan) हिनेदेखील खास प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट करत लिहिले की, “खूप सुंदर दिसत आहेस सबा.” यासोबतच तिने दोन इमोजीही पोस्ट केले आहेत. अशात सुझेनच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रत्येकजण याची वाट पाहत होते की, सबा यावर काय प्रतिक्रिया देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad) 

सबाची कमेंट
सबा आझाद हिनेदेखील सुझेनच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. तसेच, तिने सुझेनच्या इंस्टा स्टोरींचीदेखील प्रशंसा केली. सबाने कमेंट करत लिहिले की, “धन्यवाद माझी सूझ. तुझ्या हॉलिडे स्टोरीज खूप आवडल्या. अशाच अपडेट देत राहा.” सुझेन ही सध्या अर्सलन गोनी याच्यासोबत कॅलिफोर्नियाच्या सफरीवर गेली आहे. यादरम्यान तिने तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सर्वांवर सबाने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शानदार लूकमध्ये दिसली सबा
सबाने शेअर केलेल्या जाहिरातीच्या व्हिडिओत सबा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने आकाशी रंगाचा सलवार कमीज परिधान केला आहे. सोबतच कानात झुमके आणि हातात खनकणाऱ्या बांगड्या तिच्यावर शोभून दिसत आहेत. सबाची हेअरस्टाईलदेखील तिच्या सुंदरतेत चार चाँद लावत आहेत.

कोण आहे सबा आझाद?
ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड म्हणली जाणारी सबा आझाद (Hrithik Roshan Girlfriend Saba Azad) कोण आहे असा प्रश्न काही चाहत्यांना पडला असेल, तर सबा ही अभिनेत्रीसोबतच गायिकादेखील आहे. सबाचे ‘आय हिअर योर व्हॉईस’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले होते.

हे देखील वाचा