Friday, April 26, 2024

ऋतिक रोशनची कधीही न भरुन येणारी हानी, सर्वात जवळच्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरं तर अभिनेत्याची आजी आणि चित्रपट निर्माते जेओम प्रकाश यांच्या पत्नी पद्मा राणी ओम प्रकाश यांचे निधन झाले आहे. ऋतिक रोशनच्या आजीने वयाच्या ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्या बराच वेळ बेडवर होत्या, असे सांगितले जात आहे. जवळपास दोन वर्षांपासून त्या रोशन कुटुंबासोबत राहत होत्या आणि त्यांची प्रकृतीही काही काळापासून ठीक नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतिक रोशनच्या आजीने रात्री २ वाजता अखेरचा श्वास घेतला.

ऋतिक रोशनची आई पिंकी रोशन अनेकदा पद्मा राणीसोबतचे फोटो शेअर करताना दिसायच्या. त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच पिंकी रोशनने फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये त्या त्यांच्या आईसोबत मदर्स डे सेलिब्रेट करताना दिसल्या होत्या. या फोटोमध्ये पद्मा राणी बेडवर होत्या, तर पिंकी रोशन त्यांच्यासोबत केक कापण्याचा प्रयत्न करत होत्या. (hrithik roshan maternal grand mother padma rani passed away)

दुसरीकडे, पद्मा राणींचे पती जे ओम प्रकाश यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. त्यांचे अनेक चित्रपट असे आहेत, जे आजवर सिनेजगतात स्मरणात आहेत. ज्यात ‘आई मिलन की बेला’, ‘आये दिन बहार के’, ‘आया सावन झूम के’, ‘आँखों आँखों में’ आणि ‘आखिर क्यूं’ या त्यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. पद्मा राणीप्रमाणेच जे ओम प्रकाश यांनीही वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

 

हे देखील वाचा