बॉलिवूडमधील ‘मुघल-ए-आझम’, ‘ताजमहाल’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’, ‘मंगल पांडे’, ‘रझिया सुलतान’ यांसारखे ऐतिहासिक चित्रपट तयार झाले आहेत. यापैकीच एका चित्रपटाचे नाव आहे ‘बाजीराव मस्तानी’, जो एन एस इनामदार यांच्या ‘राव’ या कादंबरीवर आधारित आहे. यात मराठा साम्राज्यातील पेशवा बाजीराव आणि बुंदेलखंडची मुस्लिम राजपूत राजकन्या मस्तानी यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी हा चित्रपट २०१५ मध्ये मोठ्या पडद्यावर लाँच केला होता. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), मिलिंद सोमण (Milind Soman) आणि तन्वी आझमी (Tanvi Azmi) यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
काय आहे चित्रपटाची कथा?
या चित्रपटाची कथा पेशवा बाजीराव यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना देशभरात मराठा साम्राज्याचे राज्य पहायचे होते. दरम्यान, बुंदेलखंडची राजकुमारी मस्तानी आपले राज्य वाचवण्यासाठी पेशवा बाजीरावांकडे मदत मागते. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पेशवे घराणे या दोघांचे प्रेम कधीच स्वीकारत नाही. पेशवे घराण्याचा मस्तानीबद्दलचा द्वेष इतका वाढतो की, पेशवा बाजीरावाच्या अनुपस्थितीत तिला कैद करून मारले जाते. त्यानंतर पेशवेही आपला जीव सोडतात. (know about the bollywood film bajirao mastani)
हा चित्रपट उत्तम संगीत, उत्तम गाणी आणि उत्तम ऍक्शन सीन्सने परिपूर्ण होता. चित्रपटात ऐतिहासिक क्षणांना चांगले जिवंत केले आहे. कदाचित याच कारणामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह नऊ फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त यश मिळवले. १४५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण ३५६ कोटींची कमाई केली. रणवीर आणि दीपिकाच्या जोडीने चित्रपटात धुमाकूळ घातला. याआधीही दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र यशाचे विक्रम मोडले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा