Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांमध्ये आहेत टोकाचे वाद, चित्रपटातही एकत्र काम करण्यास दिला नकार

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांमध्ये आहेत टोकाचे वाद, चित्रपटातही एकत्र काम करण्यास दिला नकार

हिंदी सिने जगतातील कलाकारांच्या घट्ट मैत्रीची उदाहरणे अनेकदा ऐकायला मिळत असतात. त्याचप्रमाणे काही कलाकारांची कट्टर दुश्मनीही बॉलिवूड जगतात चर्चेचा विषय राहीला आहे. पडद्यावरील वादांप्रमाणे अनेक कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातही वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. आणि हा वाद इतका टोकाला गेला की या कलाकारांनी चित्रपटांमध्येही एकत्र काम करण्यास नकार दिला आहे. कोणते आहेत ते बॉलिवूड कलाकारा ज्यांच्यात असे वाद आहेत. चला जाणून घेऊ. 

सलमान खान : ऐश्वर्या राय- बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते आणि चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडली होती, मात्र त्यानंतर दोघे आजपर्यंत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले नाहीत. रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्याला घ्यायचे होते पण अभिनेत्रीने सलमानसोबत काम करण्यास नकार दिला आणि यामागचे कारण सर्वांनाच माहित आहे.

रणवीर सिंग : कॅटरिना कैफ  – मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना 2016 मध्ये आलेल्या ‘बार बार देखो’ या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते पण रणवीर सिंगने या चित्रपटासाठी नकार दिला होता. त्यावेळी कतरिना आणि दीपिका यांचे संबंध चांगले नव्हते आणि त्यामुळे रणवीरने अभिनेत्रीसोबत काम करण्यास नकार दिल्याचे बोलले जाते.

अमिताभ बच्चन : करीना कपूर – अभिनेत्री राणी मुखर्जी ब्लॅक या चित्रपटात दिसली होती पण असे म्हटले जाते की तिच्या आधी करिनाला यासाठी अप्रोच करण्यात आले होते पण बिग-बींनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला, त्यानंतर राणीला या चित्रपटासाठी साइन करण्यात आले.

विकी कौशल : दीपिका पदुकोण – शाहिद कपूर संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात दीपिकासोबत महाराजा ‘रतन सिंह’च्या भूमिकेत दिसला होता पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भूमिका सर्वप्रथम विक्की कौशलला ऑफर करण्यात आली होती पण विकी कौशलने अभिनेत्रीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा