Tuesday, May 21, 2024

Birth Anniversary:घरातूनच मिळाले संगीताचे बाळकडू, जाणून घ्या आरडी बर्मन यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी

संगीताच्या जगातील काही महान दिग्गजांना या जगतात विशेष स्थान मिळाले आहे, जे प्रत्येकाचे स्वप्न आहे. आरडी बर्मन म्हणजेच राहुल देव बर्मन (RD Burman) हे चित्रपट जगतातील एक चमकता तारा आहेत, जो नेहमीच चमकत राहील. बर्मन यांनी चित्रपट जगतातील आपल्या अतुलनीय संगीताने संपूर्ण जगाला प्रभावित केले आणि भारतीय चित्रपटांमधील संगीत एका वेगळ्या उंचीवर नेले. 60 ते 80च्या दशकात त्यांनी शेकडो चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली. जोपर्यंत पंचम दा होते तोपर्यंत ते एकटेच होते, त्यांची उंची इतकी मोठी होती आणि संगीताचा प्रभाव इतका होता की, त्यांच्यासमोर सगळेच गायब व्हायचे.

आरडी बर्मन यांचा जन्म 27 जून 1939 रोजी झाला. ते त्यावेळी कोलकात्याच्या राजघराण्यातील होते. बर्मन यांच्या घरचे वातावरण संगीतमय होते. सर्वत्र सर्जनशील लोक होते. त्यांचे वडील सचिन देवबर्मन हे देखील हिंदी चित्रपटांचे संगीतकार होते आणि आई मीरा देवबर्मन गीतकार होत्या. त्याचवेळी त्यांचे आजोबा आणि आजी अनुक्रमे त्रिपुरा आणि मणिपूरचे राजकुमार आणि राजकन्या होत्या. बर्मन यांचे सर्व शिक्षण बंगालमध्ये झाले. त्यांच्या घरात संगीताचे वातावरण होते, त्यामुळे त्यांनी लहान वयातच संगीताला सुरुवात केली.

‘पंचम’ नावामागील रंजक कथा
बर्मन यांचे आणखी एक नाव होते ज्याची खूप चर्चा होती. चाहते त्यांना प्रेमाने ‘पंचम दा’ म्हणायचे. पंचम या नावामागेही एक कथा आहे. त्यांचे नाव पूर्वी ‘तबलू’ होते. त्यांच्या पंचम नावामागील कथा सांगितली जाते की, ते लहानपणी रडायचे तेव्हा त्यांचे रडणे सरगमच्या ‘प’ सारखे ऐकू येत असे. म्हणूनच त्यांच्या आजीने त्यांना हे नाव दिले. पंचम दा यांचा चित्रपट प्रवास असा होता की, त्यांनी त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेत्यासोबत काम केले.

वयाच्या ९व्या वर्षी केली संगीताला सुरुवात
बर्मन यांनी लहानपणापासूनच संगीताला सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी ‘ए मेरी टोपी’ हे पहिले गाणे तयार केले. हे गाणे त्यांच्या वडिलांनी 1956मध्ये आलेल्या ‘फंटूश’ चित्रपटात वापरले होते. बर्मन यांनी1957मध्ये आलेल्या गुरु दत्त यांच्या ‘प्यासा’ चित्रपटातील ‘सर जो मेरा चक्राये’ या गाण्याची ट्यून तयार केली होती. बर्मन यांनी चित्रपटांमध्ये पहिले काम 1959मध्ये निरंजन दिग्दर्शित ‘राज’ या चित्रपटात केले होते. या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये संगीतकार म्हणून पदार्पण केले. यानंतर त्यांनी मोठ्या चित्रपटांना संगीत दिले.

पंचम दा यांनी तीन दशके केले राज्य
तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या बर्मन यांनी सुमारे 331 चित्रपटांना संगीत दिले. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा अभिनय, किशोरचा आवाज आणि पंचम दा यांचे संगीत हे त्रिकूट सिनेमात खूप गाजले. दोघांनी मिळून जवळपास 32 चित्रपटांमध्ये काम केले. आर डी बर्मन साहेबांचे 4 जानेवारी 1994 रोजी मुंबईत निधन झाले. संगीताच्या विश्वाला त्यांनी स्वत:चे असे विश्व बनवले, जे बघून आजही चाहते खूप काही शिकतात. त्यांचे संगीत शतकानुशतके अमर राहील.(rd burman birthday know interesting facts about him)

अधिक वाचा- 
अभिनेत्री कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, ‘हे नात टिकवण्यासाठी ..’
Birthday | आरजेची नोकरी सोडून बनली यूट्यूबर, ‘असा’ मिळाला प्राजक्ता कोळीला बॉलिवूडमधील मोठा चित्रपट

हे देखील वाचा