लैंगिक छळ प्रकरणी दक्षिण भारतीय अभिनेता विजय बाबूचा (Vijay Babu) त्रास काही कमी होताना दिसत नाहीये. यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करूनही अभिनेत्याला दररोज तपास अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागते. अलीकडेच अभिनेता आणि निर्माता विजय बाबू, त्याच्यावर दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. २२ एप्रिल रोजी एका अभिनेत्रीने अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती.
अधिकाऱ्यांसमोर हजर झाला अभिनेता
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता विजय बाबू आज म्हणजेच २७ जून रोजी सकाळी एर्नाकुलम टाऊन साऊथ पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याच्यावर दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पोलीस ठाण्यात उपस्थित तपास अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. तिथून त्याचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यात विजय बाबू पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. (vijay babu south actor producer appeared before police officers in sexual assault case)
Kerala | Actor-producer Vijay Babu appeared before probe officials for the sexual assault case registered against him. He has appeared in the Ernakulam Town South Police station.
Earlier Kerala High Court granted anticipatory bail to him in the case. pic.twitter.com/ahKOqPKtg4
— ANI (@ANI) June 27, 2022
अभिनेता आणि निर्माता विजय बाबू याच्याविरोधात २२ एप्रिल रोजी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच दिवसांनंतर, फेसबुक लाईव्ह दरम्यान पीडितेची ओळख उघड केल्यामुळे अभिनेत्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दुबईला रवाना झाला होता. त्याचवेळी विजय या प्रकरणाबाबत फेसबुकवर लाइव्ह देखील आला होता आणि त्याने स्वतःला पीडित असल्याचा दावा केला होता.
अभिनेत्याने दिला ‘AMMA’मधून राजीनामा
या आरोपांनंतर विजय बाबूने ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स’च्या (AMMA) कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. त्याने AMMAच्या कार्यकारिणीतून बाहेर होणार असल्याचे पत्र पाठवले होते. असोसिएशननेही विजय बाबूचा निर्णय मान्य केला होता. तसेच विजयच्या पत्रानंतर AMMAचे सरचिटणीस अडवेला बाबू यांनीही एक निवेदन जारी केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा