Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड उदयपूर हत्याकांडानंतर हादरली सिनेसृष्टी! बॉलिवूड कलाकारांकडून होतोय संताप व्यक्त, वाचा सविस्तर

उदयपूर हत्याकांडानंतर हादरली सिनेसृष्टी! बॉलिवूड कलाकारांकडून होतोय संताप व्यक्त, वाचा सविस्तर

बॉलिवूड कलाकारांची देशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर करडी नजर असते. हे कलाकार आपल्या देशात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींवर आपले मत मांडताना दिसतात. मात्र, यावेळी असे काही घडले आहे, ज्यावर सगळे कलाकार प्रतिक्रिया देण्यासाठी तुटून पडले आहेत. आख्ख्या देशातून या घटनेबाबत चर्चा होत आहे. तसेच, अनेकजण संतापही व्यक्त करत आहेत. चला तर जाणून घेऊया नेमक्या कोणत्या घटनेबाबत एवढी चर्चा होत आहे.

मंगळवारी (दि. २८ जून) उदयपूर येथे शिंपी कन्हैयालाल (Kanhaiyalal) याची निर्घुण हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. कन्हैयालाल याने नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते. त्यानंतर त्याची दोन युवकांनी हत्या केली. त्यामुळे सर्वजणच हैराण झाले आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे सर्वांच्याच अंगावर काटा आला आहे.

कलाकारांच्या प्रतिक्रिया
या प्रकरणावर आता सिने कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये लकी अली, कंगना रणौत, गौहर खान, रणवीर शौरी, अनुपम खेर, देवोलीना भट्टाचार्जी, स्वरा भास्कर आणि केआरकेसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. धर्माच्या नावावर ज्याप्रकारे कन्हैयालालची हत्या (Kanhaiyalal Muder Case) करण्यात आली, त्याची सर्वांनीच टीका केली. गायक लकी अली (Lucky Ali) यांनी कन्हैयालाल याच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, “एका व्यक्तीला मारणे म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या करण्यासारखे आहे. कृपया त्यांना मुस्लिम शिक्षा द्या. जसे त्यांनी इस्लामच्या नावावर पाप केले आहे.”

Lucky-Ali
Photo Courtesy Facebookofficialluckyali

https://twitter.com/RanvirShorey/status/1541776105560227842?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1541776105560227842%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fentertainment%2Fbollywood-news%2Fstory%2Fudaipur-tailor-kanhaiyalal-murder-bollywood-celebs-reaction-luck-ali-demands-justice-tmov-1490112-2022-06-29

कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “ज्याप्रकारे कन्हैयाच्या हत्येचे व्हिडिओ बनवण्यात आले आहेत, माझ्यात ते पाहण्याची हिंमत नाही. मी सुन्न झाली आहे.” यावर अनुपम खेर यांनीही राग व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “भीतीदायक… दु:खी… राग.” केआरकेनेही ट्वीट करत लिहिले की, “पैंगबर मुहम्मद यांनी कधीच कोणाला शारीरिकरीत्या नुकसान पोहोचवले नाही. त्यामुळे कोणीही अशा गुन्हेगारी वृत्तीचा वापर केला नाही पाहिजे.”

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने लिहिले की, “शांततेच्या दूतांकडे अशांतता पसरवण्याची शस्त्रे असावीत? ही पूर्वनियोजित हत्या होती की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशी शस्त्रे असणे सामान्य आहे.”

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
राजस्थानच्या उदयपूर येथे शिंपी कन्हैयालाल याने नुपूर शर्माच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. त्याच्या वक्तव्यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी होती. कन्हैयालाल याने पोलिसांना पत्र लिहीत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली होती. २८ जून रोजी दोन मुले कन्हैयालालच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले आणि आरोपींनी कन्हैयालालची निर्घुण हत्या केली. सर्वात भयंकर बाब अशी की, या दोन गुन्हेगारांनी कन्हैयालालचे डोके धडावेगळे करण्याचा प्रयत्नही केला आणि या हत्येचा व्हिडिओ बनवत पोस्ट केला.

या घटनेनंतर राजस्थानमध्ये २४ तासांसाठी मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यात एक महिन्यासाठी कलम १४४ देखील लागू करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा