Saturday, April 20, 2024

…म्हणून शाहरुख खान करत नाही अक्षय कुमारसोबत काम, अभिनेत्याने स्वतः केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान (shahrukh khan)आणि ‘बॉलीवूड के खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमारची (akshay kumar) जोडी 1997 साली ‘दिल तो पागल है’ चित्रपटात पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर दोघांची जोडी एकत्र दिसली नाही. मात्र, त्याच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहायचे आहे. पण कदाचित चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते कारण ‘दिल तो पागल है’ नंतर किंग खानने अक्षयसोबत काम करणार नसल्याचे ठरवले होते. यामागची कारणे काय आहेत, हे त्यांनीच सांगितले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ही घटना तेव्हा घडली जेव्हा अक्षय कुमारचे एकापेक्षा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत होते आणि त्याचवेळी चाहते ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुख खानच्या कमबॅकची वाट पाहत होते. एका मुलाखतीत किंग खानला विचारण्यात आले होते की, ‘दिल तो पागल है’ रिलीज होऊन 24 वर्षांनंतर तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसला नाही? त्यानंतर किंग खानने एका मुलाखतीदरम्यान यामागचे कारण सांगितले.

शाहरुखने उत्तर देत म्हटले की, “मी अक्षयसोबत काम करू शकत नाही, यात मी काय करू शकतो. अक्षय कुमार जितक्या लवकर उठेल तितक्या लवकर मी उठू शकत नाही. मी झोपायला जातो तोपर्यंत त्यांची उठायची वेळ झालेली असते. त्याचा दिवस लवकर सुरू होतो. मी कामाला लागेपर्यंत त्याची बॅग भरलेली असेल आणि तो घरी जायला तयार असेल. शाहरुख पुढे म्हणाला की, मी या बाबतीत थोडा वेगळा आहे. रात्री उशिरापर्यंत शूटिंग करायला आवडणारे माझ्यासारखे फारसे लोक तुम्हाला सापडणार नाहीत.” अशाप्रकारे त्याने कारण सांगितले.

एकीकडे अक्षय कुमार ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘सेल्फी’ करत आहे. ‘गोरखा’ आणि ‘हेरा-फेरी 3’ धमाल उडवणार असतानाच शाहरुख खान ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ या आगामी चित्रपटांसह 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अनिल कपूर अन् त्यांच्या पत्नीने नातू वायूला दिले ‘हे’ खास गिफ्ट, जाणून घ्या गिफ्टचा अर्थ
अजूनही एडल्ट चित्रपटांचा व्यवसाय करताे राज कुंद्रा? सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

हे देखील वाचा