सन २०१४ मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या सिनेमाने तब्बल १७० कोटींचा गल्ला जमवला होता. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘एक व्हिलन’ या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ येत आहे. मुंबईत नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यादरम्यान सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. मात्र, यादरम्यान जशी अभिनेत्री दिशा पटानी हिला स्टेजवर बोलावण्यात आले, तेव्हा तिचा लूक पाहून प्रत्येकजण तिच्या घायाळ करणाऱ्या लूकचा दीवाना झाला.
परिधान केला काळ्या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस
या खास प्रसंगी दिशा पटानी (Disha Patani) काळ्या रंगाचा असा आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली की, लोक तिला बघतच राहिले. यावेळी दिशाने काळ्या रंगाच्या लाँग स्कर्टसह त्याच रंगाची ब्रालेट परिधान केली होता. विशेष म्हणजे, अभिनेत्रीची ही ब्रालेट फक्त दोन दोरींवर टिकली होती.
View this post on Instagram
दिशाचा हा ड्रेस इतका रिव्हिलिंग होता की, ती जशी स्टेजवर आली, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याकडेच होत्या. दिशाचा हा ड्रेस इतका टाईट होता की, तिला चालताना आणि फिरतानाही अडचण येत होती. स्टेजवर गेल्यानंतरही अभिनेत्री हाय हील्स आणि टाईट कपड्यांमध्ये खूपच सांभाळून चालताना दिसली.
View this post on Instagram
सिनेमात दिले बोल्ड सीन्स
या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये दिशा पटानी (Disha Patani) जॉन अब्राहम (John Abraham) याच्यासोबत बोल्ड सीन आणि इंटीमेट सीन देताना दिसली आहे. तसेच, दिशाव्यतिरिक्त या सिनेमात तारा सुतारिया (Tara Sutaria) अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्यासोबत लिपलॉक सीन देताना दिसली आहे. हा सिनेमा २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
यापूर्वी ८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ (Ek Villain) सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख झळकले होते. या सिनेमात नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ होता आणि खलनायकाच्या भूमिकेत रितेश होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-