Thursday, March 28, 2024

कोट्यवधी रुपयांची मालकीण बनलेल्या अंकिताने शेअर केला नवीन घराचा व्हिडिओ, करून दिली संपूर्ण कुटुंबाची ओळख

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जिचा समावेश होतो, ती म्हणजे अंकिता लोखंडे होय. अंकिताला टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. ती आपल्या कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते तिच्या व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्व गोष्टी इंस्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमधून समजतात. अंकिताला सोशल मीडियावर ४० लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत असते. अशात तिने एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती नवीन घरात प्रवेश करताना दिसत आहे. तसेच ती कुटुंबाची ओळख करून देताना दिसत आहे. यामध्ये सासू-सासरे, दीर-जाऊ, आई, स्वंयपाकघर, पती आणि मंदिरासोबतच आतमधील घरही दाखवत आहे.

अंकिताचा खास व्हिडिओ
अंकिताचा हा व्हिडिओ खूपच खास आहे. कारण, अंकिताने आपले जुने पात्र ‘अर्चना देशमुख’ हिलादेखील दुसरा प्रसिद्ध कार्यक्रम ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ याच्या ‘तुलसी वीरानी’ हिच्यासोबत जोडले आहे. ‘तुलसी वीरानी’ शोच्या सुरुवातीला संपूर्ण घराची ओळख करून देताना दिसली होती, तीच शैली अंगीकारत अंकिताने आपल्या नव्या कुटुंबाची ओळख करून दिली आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला अंकिता लोखंडे मुख्य दरवाजा उघडून स्वागत करते. यानंतर सासूकडे जाते. त्यानंतर सासऱ्यांकडे, मग दीराकडे, जाऊबाईंकडे, आईकडे, स्वयंपाकघराकडे आणि मग पती विकी जैनकडे येते. शेवटी ती मंदिराच्या दिशेने घेऊन जाते. अंकिता लोखंडेचा हा व्हिडिओ खूपच शानदार आहे. सोनेरी, लाल, बनारसी साडी, मोकळे केस, मंदिरातील दागिन्यांमध्ये नवी नवरी झालेली अंकिता यावेळी खूपच सुंदर दिसत आहे.

हा व्हिडिओ अंकिताच्या लग्नानंतरचा आहे. यामध्ये फरक एवढाच आहे की, अभिनेत्रीने हा व्हिडिओ लग्नाच्या काही महिन्यांनंतर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अंकिता लोखंडेने स्म्रिती इराणी आणि एकता कपूर यांचेही आभार मानले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा