छोट्या पडद्यावरील सगळ्यांची आवडतीची आणि चर्चित असलेली अभिनेत्री म्हणजे ‘श्रुती झा’. श्रुती आपल्या अक्टिंग करिअरमध्ये बरीच उंच मजल मारताना दिसत आहे. टीव्ही सीरिअल्समधून ती आज घराघरात पोहचली आहे. परंतु हे यश तिला काय सहज मिळाले नाहीये, त्यासाठी तिला तेवढे कठीण परिश्रम देखील घ्यायला लागले आहेत. तेव्हा कुठे जाऊन तिला यश मिळाले आहे. आज श्रुतीचा 35 वा वाढदिवस आहे.
श्रुती झा हे नाव घेतल्यावर प्रत्येकाच्या ओठावर ‘कुमकुम भाग्य’ हे नाव येते. त्यातील प्रज्ञा नावाचं पात्र तिने अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावले. साधी, सरळ एका सोज्वळ भूमिकेतून तिने प्रत्येकाच्या मनावर राज्य केले. श्रुतीला तिच्या नावाने कमी आणि प्रज्ञा या नावानेच सगळे ओळखतात.
श्रुतीचा जन्म 26 फेब्रुवारी 1986 मध्ये बिहारमध्ये झाला. परंतु तीच बालपण कोलकाता येथे गेले. 10 वर्ष तिथे गेल्यानंतर ती संपूर्ण कुटुंबासोबत नेपाळमधील काठमांडू इथे शिफ्ट झाली. तिने बीए इंग्लिशमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केले. तिथे ती इंग्लिश ड्रामा सोसायटीसोबत काम करू लागली. तिथूनच तिच्या स्वप्नांचा खरा मार्ग सुरू झाला.
दिल्लीमध्ये शिक्षण घेत असताना तिला टीव्हीवरील ‘धूम माचाओ धूम’ या सीरियलसाठी निवडले होते. तिने या सीरियलमध्ये अत्यंत लाजाळू आणि अंधविश्र्वासू मुलीची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘जिया जले’ या सीरियलमध्ये काम केले. ही सीरियल जास्त दिवस नाही चालली, परंतु या सीरियलमुळे तिला नाव मिळाले आणि तिची अक्टिंग देखील सगळ्यांना आवडायला लागली. त्यानंतर तिला छोट्या पडद्यावर अनेक कामे मिळायला लागली.
त्यानंतर श्रुतीने ‘ज्योती’ या सीरियलमध्ये काम केले. या सीरियलमध्ये तिने सुधा या मुलीचं पात्र निभावलं होत, जिला पर्सनालिटी डिसाॉर्डर हा आजार असतो. म्हणजे ती दिवसा सिधी साधी सुधा असे. परंतु रात्रीची ग्लॅमरस देविका बनून सगळीकडे फिरत असे.
यानंतर तिने ‘शौर्य ओर सुहानी’ या सीरियलमध्ये देखील राजकुमारी सुहानीची मुख्य भूमिका निभावली होती. नंतर तिने ‘रक्तसंबंध’ या सीरियलमध्ये काम केले. यामध्ये ती एका आंधळ्या मुलीची भूमिका निभावत होती. यानंतर श्रुतीच्या करिअरने एक वेगळीच भरारी घेतली.तीला ‘दिलं से दीं दुवा’, ‘सौभाग्यवती भव:’ या सीरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
श्रुती ‘कुंडली’ या सीरियलमध्ये देखील दिसली होती. तसेच सगळ्यांची परिचित :बालिका वधू’ यामध्ये देखील काम करण्याची तीला संधी मिळाली होती. या सीरियलमध्ये काम करता करताच तिला ‘कुमकुम भाग्य’ या सीरियलची ऑफर आली.
श्रुतीने या सीरिअल्समध्ये काम करून घराघरात आपले नावं पोहचवले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसते. इंस्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करून ती नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. त्यामधील अनेक फोटोज्मध्ये तिचा बिकनीतील बोल्ड अंदाज देखील पाहायला मिळाला आहे.