दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटातील याच दमदार अभिनयामुळे दीपिकाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तिची एक झलक पाहायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशाच एका उत्साही चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याला दीपिकाने चांगलेच खडसावलेले दिसत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील पावरफुल कपल म्हणून ओळखले जाते.दोघांनीही आपल्या आव्हानात्मक भूमिकांमुळे सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी सिने जगतातील बाजीराव आणि मस्तानी म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सध्या दोघेही कॅलिफोर्निया मध्ये एका समारंभासाठी गेले होते. यावेळी एका चाहत्याने केलेल्या अजब मागणीमुळे दीपिका पदुकोण चांगलीच संतापलेली दिसली. सध्या हाच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये दीपिकाला पाहुन एका चाहत्याने आय लव यू दीपिका असा आवाज दिल्याचे दिसत आहे. चाहत्याच्या या आवाजाने संतापलेल्या दिपीकाने “आता माझं लग्न झाल आहे, व्यवस्थित बोलत जा,” अशा शब्दात या चाहत्याचा समाचार घेतला. दीपिकाचे हे उत्तर ऐकून उपस्थित लोकांंमध्ये चांगलाच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.सध्या मीडिया जगतात याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, या कार्यक्रमातील दीपिकाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेले पाहायला मिळाले. कार्यक्रमातील तिचे सुंदर फोटो दीपिकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. अभिनेत्री दिपिका पदुकोणचा अलिकडेच आलेला ‘गेहराईया’ चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटातील दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. सिद्धांत आणि दीपिका प्रमाणेच ‘गेहराइंया’ चित्रपटामध्ये अनन्या पांडेनेही भूमिका साकारली होती. अनन्याच्या दमदार अभिनायाचेही जोरदार कौतुक झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा
जरा जपून पोरी! मुंबईच्या पावसात नोराची दैना, साडी सांभाळताना घसरला पदर अन् पुढं जे झालं…
आलियाचा १३ सेकंदाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून तिच्या आईलाही बसला शॉक, मुलीच्या चाहत्यांना उघडपणे म्हणाली…