Sunday, May 26, 2024

जरा जपून पोरी! मुंबईच्या पावसात नोराची दैना, साडी सांभाळताना घसरला पदर अन् पुढं जे झालं…

सध्या सर्वत्र पावसाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये मुंबई शहर आघाडीवर आहे. मुंबईतील पावसाबद्दल सर्वांनाच माहितीये. इथे कधी पाऊस येईल आणि जाईल याचा कुणालाही नेम नाही. या पावसामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता नंबर लागलाय अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही हिचा. नोराने साडी नेसल्यामुळे तिला पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. तिचा यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

साडी नेसून अडचणीत सापडली नोरा
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोमवारी (दि. ०४ जुलै) डान्स दीवाने ज्युनिअरच्या सेटवर स्पॉट झाली होती. यावेळी ती सुंदर साडीत दिसली. मात्र, दुपारी पावसाने एन्ट्री केली आणि मुंबईत जोरदार पाऊस पडला. मात्र, पावसामुळे नोरा साडीमध्ये जरा अडचणीत सापडली. मात्र, सेट ते व्हॅनिटी व्हॅनपर्यंत खास गाडीची सोय केली होती. तसेच, गाडीपासून ते व्हॅनिटी व्हॅनपर्यंत पोहोचण्यात नोराला अडचणींचा सामना करावा लागला. नोराच्या साडीचा पदर एका व्यक्तीने पकडला होता. तसेच, नोराने तिची साडी गुडघ्यापर्यंत उचलून व्हॅनिटी व्हॅनपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

घसरला नोराचा पदर
व्हॅनिटी व्हॅनमध्ये नोरा गेली खरी, पण व्हॅनिटीमधून उतरताना पुन्हा सेटपर्यंत पोहोचणे नोरासाठी सोपे नव्हते. साडी सांभाळताना तिचा पदर घसरला. यावेळी पाहणारेही पाहतच राहिले. नोरा जेव्हाही साडीत दिसते, तेव्हा तिच्या सुंदरतेमध्ये आणखीनच भर पडते. नोराने नेसलेल्या या गुलाबी साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या साडीची डिझाईन आणि लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे. नोराचा हा अंदाज प्रत्येकाला आवडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

‘डान्स दीवाने ज्युनिअर’ शोमध्ये बनलीय परीक्षक
नोरा फतेही हिने बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. शानदार डान्सर असलेली नोरा सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर आणि कोरिओग्राफर्ससोबत ‘डान्स दीवाने ज्युनिअर’ रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त ती तिच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओंमुळेही चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘तू इतकी सेक्सी का आहेस?’, अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या फोटोंवरील चाहत्याची कमेंट वेधतेय लक्ष

काली माताच्या हातात दिसला LGBTQचा झेंडा अन् सिगारेट, #ArrestLeenaManimekalai होतंय ट्विटरवर ट्रेंड

आलियाचा १३ सेकंदाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून तिच्या आईलाही बसला शॉक, मुलीच्या चाहत्यांना उघडपणे म्हणाली…

हे देखील वाचा