मराठी सिने जगतात असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्तीत जास्त चर्चेत असतात. यामध्ये अभिनेते किरण मानेंच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत असते. किरण माने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या या पोस्टमुळे अनेकदा त्यांच्यावर जोरदार टिकाही होत असते. सध्या किरण माने यांची अशीच एक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल परखड शब्दात टिका केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना पक्षाच्याच आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरेंना सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. बंडखोर आमदारांनी गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकल्याने राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला होता. राज्यातील राजकारण्यांसह सामान्य जनतेतही या सगळ्या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. या सगळ्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र बंडखोरांवर जोरदार टिका केली होती. यावरच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी “साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात,” अशा मजेशीर शब्दात राज्याच्या राजकारणावर जोरदार टिका केली आहे. किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार टिकाही केली आहे.
https://www.facebook.com/kiran.mane.9047
दरम्यान, अभिनेते किरण माने यांच्या मुलगी झाली हो कार्यक्रमाचा वाद चांगलाच रंगला होता. किरण माने यांना तडकाफडकी मालिकेतून काढल्याने या वादाला सुरूवात झाली होती. यावर किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याने काढण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
आई होण्यापूर्वी आलिया बनणार ‘डार्लिंग’, ‘या’ दिवशी उलघडणार रहस्य
‘लाळ टपकेपर्यंत पान खाणे अन् धोतरवर…’, किशोर कुमारांच्या अटी ऐकून हादरले बीआर चोप्रा
कियारा अडवाणीच्या प्रेमापोटी वेड्या चाहत्याने केलं ‘हे’ कृत्य, हैराण झाली अभिनेत्री