Friday, December 8, 2023

‘लाळ टपकेपर्यंत पान खाणे अन् धोतरवर…’, किशोर कुमारांच्या अटी ऐकून हादरले बीआर चोप्रा

किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्यासारखा बॉलिवूडमध्ये दुसरा कोणी होऊ शकला नाही. गायन, अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मितीपासून ते अनेक किस्से-कथांनी भरलेला माणूस. किशोर कुमार यांचा दृष्टिकोन वेगळा होता. ते रील लाइफमध्ये जितके चांगले विनोदी अभिनेता होते, तितकेच खऱ्या आयुष्यातही ते विनोदाने परिपूर्ण होता. त्यांच्या विनोदाच्या अनेक कथा सर्वसामान्यांच्या जीवनातही प्रसिद्ध आहेत. जे बहुतेक त्यांच्या मूडशी संबंधित असतात. त्यामुळे अनेकदा लोकांचा गैरसमजही झाला. किशोर कुमार यांचा ‘जशास तसे’ जीवन जगण्यावर विश्वास होता. असाच एक किस्सा म्हणजे किशोर कुमार आणि बीआर चोप्रा (B.R. Chopra) यांचा.

काम मागायला गेले किशोर कुमार
किशोर यांचे मोठे बंधू अशोक कुमार (Ashok Kumar) हे त्यांच्या काळातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. तरीही किशोर कुमार यांना अभिनेता होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. बेरोजगारीच्या दिवसात ते अनेक मोठ्या निर्मात्यांच्या कार्यालयात जात असत. अशोक कुमार यांचे बी.आर. चोप्राशी चांगले संबंध असल्याने, ते त्यांना काम देतील, असा विचार करून एका किशोर निर्माता-दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांच्याकडे गेले. मात्र चोप्राने नकार न देता काही अटी घातल्या. किशोरला याचं खूप वाईट वाटलं. त्यांनी अटी मान्य करण्यास नकार देत म्हणाले, ‘ठीक आहे, तुम्ही काम देत नका, पण उद्या जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तुम्ही माझ्याकडे याल. तेव्हा मी माझ्या इच्छेनुसार तुमचा चित्रपट स्वीकारेन.’ (kishore kumar and br chopra unknown kissa)

विचित्र अटी ऐकून हादरले चोप्रा
दिवस पुढे गेले. चोप्रा हे सगळं विसरले, पण किशोर कुमार नाही. जेव्हा बी.आर.ला त्यांच्या एका चित्रपटात गाण्यासाठी किशोरची गरज होती, जेव्हा त्यांनी त्यांच्या अटी ठेवल्या. अटी इतक्या विचित्र की बीआर चोप्रा हादरले. अटी अशा होत्या की, चोप्राला धोतरसोबत पायात मोजे आणि शूज घालावे लागतील, तोंडातून लाळ टपकेल अशा पद्धतीने पान खायचे आणि टेबलावर उभे राहून किशोरला हात जोडून चित्रपटावर सही करण्याची भीक मागायची होती. चोप्राने आयुष्यात ना धोतर घातलं, ना धोतीसोबत मोजे आणि बूट. बी.आर चोप्रा यांनी पानही खाल्ले नाही आणि इथे पान खाल्ल्यानंतर तोंडातून लाळ टपकायची होती. बी.आर चोप्राने किशोरला बिनशर्त आपल्यासाठी काम करायला लावण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण असे झाले नाही.

किशोर कुमारचा आग्रह पाहून बी.आर. चोप्राने धाकट्याला समजावून सांगण्यासाठी त्यांचा मोठा भाऊ अशोक कुमारशी संपर्क साधला. अशोक कुमार फोनवर किशोरशी बोलले, पण तो डगमगला नाही. अखेरीस, बीआर चोप्रा यांना किशोर कुमारच्या अटी मान्य कराव्या लागल्या.


हेही वाचा-
‘मी त्याला प्रपोज केलं आणि…’ रसिका सुनीलने तिच्या लव्ह लाईफबाबत केला मोठा खुलासा, म्हणाली….
मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

हे देखील वाचा