आपण अनेकदा असं पाहातो ना की एखाद्या कलाकाराला त्याने काम केलेल्या चित्रपटातील एखाद्या भूमिकेमुळे ओळखतो. किंवा एखादी भूमिका त्या कलाकाराला इतकी मोठी करते की त्याला प्रसिद्धी झोतात तर आणतेच, पण त्याचबरोबर त्याला भविष्यातही मोठे यश मिळवून देते. असं असतानाही काही कलाकार मोठ्या चित्रपटातील भूमिकाही चक्क नाकारतात. अनिल कपूर याच्या बाबतीतही असं झालंय बरं का. म्हणजे त्यानेही चक्क ‘चांदनी’ या गाजलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता, पण यामागचं कारण नक्की होतं तरी काय, चला जाणून घेऊया.
साल 1989 मध्ये आलेला चांदनी हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने श्रीदेवीला पहिली महिला सुपरस्टारही बनवून टाकले होते. या चित्रपटातील ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्याही भूमिका गाजल्या होत्या, पण अनेकांना हे माहित नाही, की ऋषी कपूर यांनी जी भूमिका या चित्रपटात केली आहे, त्यासाठी आधी अनिल कपूरला विचारण्यात आले होते. यश चोप्रा यांना चांदनी चित्रपटासाठी अनिल कपूरला घ्यायचे होते. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलीच हिट ठरली होती. या जोडीचा 1987 साली आलेला मिस्टर इंडिया हा चित्रपटही खूप गाजलेला, पण अनिल यांनी चक्क या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता, कारण त्यांना पूर्ण वेळ व्हील चेअरवर बसायचे नव्हते.
अनेकांना त्यावेळी वाटले होते की, अनिल कपूर त्याच्या स्टारडममुळे हा रोल नाकारलाय, त्याला खूप ऍटिट्यूडही आला आहे, अशा अनेक चर्चाही झाल्या, पण अनेक वर्षांनंतर अनिल कपूरनेच माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या नकारामागील कारण सांगितले होते. अनिल कपूरने सांगितलं होतं की, “तेव्हा मी त्या मनस्थितीतच नव्हतो की मी संपूर्ण चित्रपटादरम्यान व्हील चेअरवर बसेल. कारण चांदनी चित्रपटाची ऑफर येण्याआधीच काही दिवसांपूर्वी माझा अपघात झालेला. मी अडीच महिने बेडवर पडून होतो. मी माझा पाय बरा करण्यावर भर देत होतो. तो माझ्या आयुष्याला वळण देणारा काळ होता. मला वाटत होते की, मी खूप जोरात धावत आहे, पण मी कुठेही पोहचत नाहीये. मला चित्रपटांमध्ये काम करायचे होते, मी एका पाठोपाठ एक चित्रपट करायचो, मी कसलीही काळजी करत नव्हतो. हेच कारण होते की, मी चांदनीसाठी नकार दिलेला, पण मी तो पहिलाच व्यक्ती आहे की, ज्याने चांदनीची कहानी ऐकल्यानंतर यशजींना फोन करून सांगितले होते की, हा पिच्चर हिट होईल.”
खरं तर अपघातामुळे अनिल कपूरने अशी भूमिका करण्यासाठी नकार दिलेला, ज्यामुळे त्याला पुन्हा तशाच प्रकारच्या वेदनेची आठवण होईल. अखेर हा नकार ऋषी कपूर यांच्या पथ्यावर पडला आणि त्यांना चांदनीमध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली. या भूमिकेने त्यांच्या प्रसिद्धीत रातोरात मोठी वाढ करून दिली. या चित्रपटात जुही चावलानेही गेस्ट अपेरियन्स दिला होता.(anil kapoor refused chandni)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनिल कपूरला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून जाम घाबरलेले लोक, भीतीमुळे थेट पोलिसांना लावलेला फोन
आणखी काय हवं! वीकेंड का वारमध्ये सलमानने सॅंटा बनून दिली ‘ही’ अनाेखी भेट