Friday, August 8, 2025
Home मराठी एक तीर दोन निशाणे! ‘डॅडी’ मकरंद देशपांडे झळकणार ‘या’ प्रोजेक्ट्समध्ये, टाका एक नजर

एक तीर दोन निशाणे! ‘डॅडी’ मकरंद देशपांडे झळकणार ‘या’ प्रोजेक्ट्समध्ये, टाका एक नजर

प्रसिद्ध मराठी अभिनेता मकरंद देशपांडे नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चाहत्यांसमोर एक नव्या भूमिकेत येणार आहे. मकरंद ‘शूरवीर’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

डिज्नी+हॉटस्टारवर १५ जुलै रोजी प्रदर्शित होणारी ही सीरिज टास्क फोर्सवर आधारित आहे. या सिरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात मकरंद यांची प्रमुख भूमिकांपैकी एक भूमिका असल्याचे लक्षात येत आहे. मकरंद हे यापूर्वी अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ते आगामी मराठी चित्रपट ‘दगडी चाळ २’ मध्येही दिसणार आहेत. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा