Sunday, August 3, 2025
Home टेलिव्हिजन ‘काय लहान बाळासारखं रडतंय’, खिलाडी बनायला निघालेल्या निशांतच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

‘काय लहान बाळासारखं रडतंय’, खिलाडी बनायला निघालेल्या निशांतच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

सध्याच्या टीव्हीजगतात अनेक शो पाहायला मिळत आहेत. यामध्ये ‘खतरों के खिलाडी १२’ या शोला प्रेक्षकांची पहिली पसंती मिळत आहे. या शोचे प्रसारण कलर्स टीव्हीवर होत आहे. यामध्ये कलाकार नवनवीन संकटांचा सामना करताना दिसत आहेत. या शोमध्ये जो कोणी जास्त चांगल्याप्रकारे खतरनाक स्टंट करतो, त्याला दीर्घकाळ टिकता येते. अशात या शोचे दोन नवीन प्रोमो शेअर केले आहेत. यामध्ये डान्सर निशांत भट्ट खूपच घाबरल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर स्टंटदरम्यान निशांत खूपच रडताना दिसत आहे.

खतरों के खिलाडी १२‘ (Khatron Ke Khiladi 12) या शोमधील पहिल्या दोन एपिसोडला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता या शोमधील नवीन प्रोमो जारी करण्यात आले आहेत. यामध्ये दिसते की, कशाप्रकारे निशांत भट्ट (Nishant Bhatt) याला थेट रडू कोसळले आहे.

लहान मुलांसारखा रडताना दिसला निशांत भट्ट
प्रोमोमध्ये रोहित शेट्टी (Rohit Shetty) निशांत भट्ट याला स्टंट करायला सांगतो. तो त्याला त्याच्या स्वत:च्याच चेहऱ्यावर बनवलेल्या होलमध्ये हात घालण्यास सांगतो. त्यानंतर निशांतची प्रकृती बिघडते. तो थेट रडायला लागतो. त्याला स्वतःच्या फोटोच्या तोंडातून चकती काढायची असते, पण खूप साऱ्या सापांमुळे तो घाबरून जातो. रोहित शेट्टी त्याला खचू न देता खालून म्हणतो की, “आपल्याच तोंडात हात घाल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावर नेटकरी कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले की, “मला जाऊद्या ना घरी.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “लहान बाळासारखं रडतंय.”

जेव्हा निशांत भिंतीवरील स्वत:च्याच तोंडात हात घालण्यास जातो, तेव्हा तिथे साप पाहून तो झटकन आपला हात बाहेर काढून घेतो. त्यानंतर तो ‘मम्मी मम्मी’ (Nishant Shouting Mummy Mummy) ओरडू लागतो. यावेळी त्याचे इतर मित्र निशांतचा आत्मविश्वास वाढवताना दिसतात.

‘खतरों के खिलाडी’चे १२वे पर्व २ जुलैपासून सुरू झाले आहे. हा शो रोहित शेट्टी होस्ट करत आहे. या शोमध्ये शिवांगी जोशी, कनिका मान, रुबीना दिलैक, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अडातिया, तुषार कालिया, एरिका पॅकार्ड, चेतना पांडे, अनेरी वजानी हे देखील स्पर्धक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सलमान-शाहरुखचे सिनेमे जेवढं कमवत नाहीत, तेवढ्यात बनलाय ऐश्वर्याचा ‘हा’ चित्रपट, टिझर पाहून येईल अंदाज

धक्कादायक! ज्याने केलं प्रेम, त्यालाच राखीने लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, व्हिडिओ जोरदार व्हायरल

मुलांना दिलेली चुकीची वागणूक पाहून टोनी कक्कर झाला दुखी; म्हणाला, ‘मला त्यांना मदत करायची आहे’

हे देखील वाचा