आपला आवडता कलाकार जेव्हा अनेक वर्षांनी पुनरागमन करतो, तेव्हा त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठीची उत्सुकता गगनाला भिडलेली असते. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबाबतही आहे. ऐश्वर्याचे चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. ती प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. आता कुठे या सिनेमाबाबत माहिती मिळण्यास सुरुवात झाली आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कहाणी चोल साम्राज्यावर आधारित आहे. तसेच, या टिझरवरून समजते की, हा सिनेमा तुफान हिट होऊ शकतो.
‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमाचा टिझर
मणिरत्नम (Mani Ratnam) चार वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांनी शेवटचा २०१८मध्ये ‘चेक चिवंथा वाणम’ (Chekka Chivantha Vaanam) या सिनेमाची निर्मिती केली होती. यानंतर आता ते लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. चोल साम्राज्यात सुरू असलेला संघर्ष या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. भारतातील पीरियड सिनेमांपैकी हा सर्वोत्कृष्ट सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे.
‘पोन्नियिन सेल्वन’चा टिझर खूपच दमदार आहे. टिझरमध्ये विक्रम, किच्चा सुदीप आणि जयम रवी दिसत आहेत. या टिझरमध्ये मोठी जहाजे, हत्ती-घोडे आणि राजवाडे पाहायला मिळतात. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि त्रिशाही अतिशय सुंदर लूकमध्ये पाहू शकता. हा सिनेमा एकदम जबरदस्त असणार आहे हे या टिझरवरून स्पष्ट होते.
‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमाची कथा १०व्या शतकातील चोल राजवंशावर आधारित आहे. यामध्ये कावेरी नदीचा मुलगा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा शासक राजराजा चोल होण्यापूर्वीची कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाचे संगीत ए आर रहमानने दिले आहे. हा सिनेमा ३० सप्टेंबर, २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात दाक्षिणात्य कलाकार विक्रम, तृषा, जयम रवी यांच्यासोबत ऐश्वर्यादेखील झळकणार आहे. या सिनेमाचे पोस्टर पाहून चाहते खूपच खुश झाले होते. आता या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सिनेमांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘पोन्नियिन सेल्वन’ भारतातील बिग बजेट सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात आहे.
#PonniyinSelvan audio rights went to #TIPS for a record price of ₹ 24 crs.. ????
— Ramesh Bala (@rameshlaus) July 7, 2022
या सिनेमाविषयी खास बाब म्हणजे, या सिनेमाचे ऑडिओ अधिकार टिप्स म्युझिक कंपनीला २४ कोटींच्या रेकॉर्डब्रेक किंमतीत विकले गेले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! ज्याने केलं प्रेम, त्यालाच राखीने लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, व्हिडिओ जोरदार व्हायरल
मुलांना दिलेली चुकीची वागणूक पाहून टोनी कक्कर झाला दुखी; म्हणाला, ‘मला त्यांना मदत करायची आहे’
‘तू ग्रहावरील सगळ्यात हॉट आई’, तीन मुलांची आई असलेल्या लिसा हेडनचा सोशल मीडियावर बिकिनीत राडा