Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड नेहमी ट्रोल होणाऱ्या राखीला चाहत्यांनी घेतले डोक्यावर, कारण ठरला ‘हा’ एकच व्हिडिओ

नेहमी ट्रोल होणाऱ्या राखीला चाहत्यांनी घेतले डोक्यावर, कारण ठरला ‘हा’ एकच व्हिडिओ

सामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार यांना देखील परिस्थितीची जाणीव असते, याचा प्रत्यय अनेकदा त्यांच्या वागण्यातून आपल्याला आला आहे. कलाकारांना गरजूंसाठी संकटसमयी धावताना आपण कोरोना काळात पाहिले आहेच. आता असाच एक प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही पाऊस पडत असताना एका वयस्क जोडप्याला मदत करताना दिसली. यामुळे तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राखी सावंतने केली वयस्क जोडप्याला मदत
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा व्हिडिओ प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी याने शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री मुंबईच्या पावसात एका वयस्क जोडप्यासाठी रिक्षा शोधताना दिसत आहे. या व्हिडिओत राखीने एक क्रॉप टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने गुलाबी पँटने तिचा पेहराव पूर्ण केला आहे.

खरं तर, वयस्क जोडपे एका रिक्षाची वाट पाहत होते. तेवढ्यात राखीने त्यांची मदत करण्याचा विडा उचलते. भर पावसात ती त्यांच्यासाठी रिक्षा शोधू लागते. जेव्हा तिला एक रिक्षावाला भेटतो, तेव्हा ते जोडपे राखीला धन्यवाद देतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सुंदर कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये “पावसादरम्यान रिक्षा शोधणे खूपच कठीण काम आहे. कधी-कधी पोलीस वरिष्ठ नागरिकांची मदत करतात, तर कधी विमानतळावर रिक्षासाठी शानदार सेवा असते. राखी सावंत ही एका वयस्क जोडप्यासाठी रिक्षा शोधण्यासाठी मदत करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) 

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, २० हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सचाही पाऊस पडला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, “मला तिचा अभिमान आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “किती चांगली आहे राखी सावंत.”

राखी सावंतबद्दल बोलायचं झालं, तर तिने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्निचक्र’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘मैं हू ना’, ‘मालामाल वीकली’, ‘क्रेझी ४’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अवघ्या १७व्या वर्षी वडील बनले होते दारा सिंग, त्यांच्यासोबत काम करताना अभिनेत्रींचा उडायचा थरकाप

एक-दोन नाही, तर तब्बल आठ भाषा बोलते रणबीरची ‘ही’ अभिनेत्री; लग्नानंतर एका महिन्यातच दिलेली गोड बातमी

मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यास घाबरायचे लोक, राजेश खन्नांपेक्षाही घ्यायचे जास्त मानधन, ‘असा’ होता दरारा

हे देखील वाचा